Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

Famous Actor Passed Away : मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यांच्या कारकि‍र्दीबद्दल जाणून घेऊयात.
Famous Actor Passed Away
Famous Actor DeathSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन झाले आहे. हॉरर चित्रपटांमधून नावलौकिक मिळवलेले प्रसिद्ध अभिनेते रेगी बॅनिस्टर (Reggie Bannister) यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. रेगी बॅनिस्टर हे मनोरंजन विश्वातील खूप मोठे नाव आहे.

e24bollywood च्या वृत्तानुसार, अभिनेते रेगी बॅनिस्टर यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 'फँटाझम' फ्रँचायझीमधील आपल्या दमदार ॲक्शन आणि अनोख्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बॅनिस्टर यांचे निधन ९ ऑगस्ट (रविवारी) सकाळी झाली. अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अभिनेते रेगी बॅनिस्टर यांची पत्नी, गिगी बॅनिस्टर यांनी चाहत्यांना अभिनेत्याच्या निधनाची बातमी दिली. रेगी बॅनिस्टर बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते. त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकन सैन्यात सेवा बजावत असताना ते 'एजंट ऑरेंज'च्या संपर्कात आले होते. यामुळे त्यांना लेवी बॉडी डिमेन्शिया आणि पार्किन्सन्स यांसारखे गंभीर आजार जडले. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

Famous Actor Passed Away
Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या मुंबईतील घरात ७६ लाखांची चोरी, बिहारमधून आरोपीला अटक

अभिनेते रेगी बॅनिस्टर यांचा जन्म ९ सप्टेंबर १९४५ रोजी कॅलिफोर्नियातील लाँग बीच येथे झाला. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्रात काम केले. त्यांना डॉन कॉस्केरेली यांच्या 'फँटाझम' या कल्ट हॉरर फ्रँचायझीमुळे त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. त्यांनी 'विशमास्टर', 'बब्बा हो-टेप', 'द क्वाएट वन्स', 'सॉब्लेड', 'प्रिमिटिव्ह', 'द ऑब्सिडियन कर्स' यांसारख्या आणि इतर अनेक चित्रपटांमध्येही काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com