‘जोरू का गुलाम’चे दिग्दर्शक शकील नूरानी यांना अटक
मुंबईतील मालवणी पोलिसांनी केली कारवाई
प्रसिद्ध अभिनेत्रीने लैंगिक छळ आणि बलात्कार प्रकरणात तक्रार दाखल केली
बोरिवली हॉलिडे कोर्टाने नूरानी यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
Joru Ka Gulam Director Shakeel Noorani Arrested In Rape Case मनोरंजन क्षेत्रातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. ‘जोरू का गुलाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शकील नूरानी यांना बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी मुंबईतील मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. एका ३३ वर्षीय अभिनेत्रीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर मनोरंजन सृष्टी हादरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका नव्या चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने शकील नूरानी यांनी संबंधित अभिनेत्रीला आपल्या घरी बोलावले होते. यावेळी तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अभिनेत्रीने तक्रारीत केला आहे. तसेच तिला कथितरीत्या नशेचे पदार्थ देण्यात आले आणि तिचे व्हिडिओ तयार करून धमकावण्यात आल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून नूरानी यांना अटक केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम 64(2)(M), 123, 351(2) आणि 88 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, बोरिवली हॉलिडे कोर्टाने शकील नूरानी यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, पुढील तपासात नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.
शकील नूरानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून परिचित आहेत. त्यांनी ‘बडे दिलवाला’ (1999) आणि ‘जोरू का गुलाम’ (2000) या चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. ‘बडे दिलवाला’मध्ये सुनील शेट्टी, प्रिया गिल आणि परेश रावल, तर ‘जोरू का गुलाम’मध्ये गोविंदा, ट्विंकल खन्ना, कादर खान आणि जॉनी लिव्हर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.