Healthcare Expenses: खासगी हॉस्पिटल लुटीचे अड्डे; दुप्पट वेगाने वाढला खासगी हॉस्पिटल खर्च

Medical Expenses : सामान्य जनतेचं कंबरडं मोडणारी बातमी समोर आलीय. राज्यातील खासगी रुग्णालयांचा खर्च महागाईच्या तुलनेत दुप्पट वेगानं वाढलाय. खासगी हॉस्पिटल कसे लुटीचे अड्डे बनलेत पाहूयात एक रिपोर्ट.
Patients and families struggle with rising medical bills at private hospitals amid increasing healthcare costs.
Patients and families struggle with rising medical bills at private hospitals amid increasing healthcare costs.
Published On
Summary
  • खासगी हॉस्पिटल खर्चात मोठी वाढ

  • महागाईपेक्षा दुप्पट वेगाने वाढ

  • सर्वसामान्यांवर आर्थिक ताण

महाराष्ट्रात खासगी हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च भरमसाठ वाढला आहे. महागाईपेक्षा दुप्पट वेगाने वैद्यकीय खर्च महागल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. मार्चमध्ये महागाईचा दर १.६४ टक्के होता. त्या तुलनेत खासगी हॉस्पिटलची बिले पाहिली तर ही हॉस्पिटल म्हणजे लुटीचे अड्डे बनलेत का असा प्रश्न निर्माण होतो.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील खासगी रुग्णालयातील उपचार खर्चाचं वास्तव समोर आलंय. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) असूनही 90% खर्च हा रुग्णांनाच करावा लागतोय. गंभीर बाब म्हणजे 77% लोकं उपचारांसाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून आहेत.

खासगी रुग्णालयातील उपचारांचा सरासरी खर्च

शहर

2017मध्ये - 42 हजार 540

आता - 67 हजार 831

गाव

2017मध्ये - 23 हजार 821

आता - 44 हजार 580

नागरिकांचा होणारा सरासरी खर्च

शहर

2018मध्ये 7 हजार 189

आता 8 हजार 631

गाव

2018मध्ये 5 हजार 606

आता 8 हजार 80

वैद्यकीय खर्चात दरवर्षी अंदाजे 14 ते 15 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळेच उपचारादरम्यान औषधांचा खर्च, रक्त आणि इतर तपासणीचा खर्च बघता भविष्यात वैद्यकीय खर्च लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

खासगी क्षेत्रात अनियमितता आणि नफेखोर धोरणामुळे ही अनावश्यक वाढ झाली असल्याचा आरोप या क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत. आरोग्य व्यवस्थेतील या नफेखोरीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com