Hina Khan: अभिनेत्री हिना खानने गळण्याआधीच कापले केस, लेकीची अवस्था पाहून आई ढसा ढसा रडली, पाहा VIDEO

Hina Khan Shared Emotional Video: व्हिडिओमध्ये अभिनेत्री हिना खान आपले केस कापताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा केस कापतानाचा व्हिडिओ पाहून तुमच्याही नक्कीच डोळ्यात पाणी येईल.
Hina Khan: अभिनेत्री हिना खानने गळण्याआधीच कापले केस, लेकीची अवस्था पाहून आई ढसा ढसा रडली, पाहा VIDEO
Hina Khan Shared Hair Cutting VideoSaam TV

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खानने तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली होती. तिला स्टेज ३ चा कॅन्सर निदान झाले आहे. सध्या तिच्यावर कीमोथेरेपीचे उपचार सुरू आहेत. आपल्या खासगी आयुष्याबद्दल हिना खान नेहमीच इन्स्टाग्रामवरून माहिती शेअर करत असते. अशातच तिचा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती आपले केस कापताना दिसत आहे. कॅन्सरमध्ये केस गळण्यापूर्वीच केस कापतानाचा व्हिडिओ पाहून तुमच्याही नक्कीच डोळ्यात पाणी येईल.

Hina Khan: अभिनेत्री हिना खानने गळण्याआधीच कापले केस, लेकीची अवस्था पाहून आई ढसा ढसा रडली, पाहा VIDEO
Bollywood Actress And Cricketer Wedding : अफेरची चर्च ते लग्नगाठ: कोणते क्रिकेटपटू अडकले बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्नबंधनात

प्रत्येक मुलीसाठी केस हा जिव्हाळ्याचा विषय आहे. मुली नेहमीच हटक्या अंदाजात हेअर स्टाईल करण्याचा प्रयत्न करत असतात. कॅन्सर या आजारात अनेकांचे केसं जातात. पण हिनाने केसं जाण्यापूर्वीच कापताना दिसत आहे. केस कापताना हिनाच्या चेहऱ्यावर जरीही आनंदी दिसत असला तरीही तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत.

काही वेळापूर्वीच हिनाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. व्हिडिओमध्ये हिनाची आईच्या डोळ्यात पाणी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या आईचा रडतानाचा आवाज ऐकू येत आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने एक भावनिक नोटही लिहिली आहे.

हिना खानने लिहिले की, "तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला आईचा रडण्याचा आवाज ऐकू येत असेल. ज्या गोष्टीची तिने केव्हाही कल्पना केली नव्हती, त्या गोष्टीसाठी सध्या ती स्वत: ला तयार करत आहे. माझ्यासारखाच कॅन्सरशी लढा देणाऱ्या सर्वांसाठी मी व्हिडिओ शेअर करत आहे. मला माहितीये हे फारच कठीण आहे. बहुतेक जणांसाठी केस म्हणजे डोक्यावरचं मुकूटच आहे, जो आपण केव्हाच काढत नाही. इतक्या मोठा आजारासोबत लढा देताना जेव्हा हेच केस जातात तेव्हा तुम्हाला महत्वाचे निर्णय घ्यावा लागतो. आणि मी कॅन्सर विरुद्ध लढा जिंकण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे."

Hina Khan: अभिनेत्री हिना खानने गळण्याआधीच कापले केस, लेकीची अवस्था पाहून आई ढसा ढसा रडली, पाहा VIDEO
Anant-Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्नात हॉलिवूड स्टार्स करणार परफॉर्म, कोण-कोण राहणार उपस्थित पाहा लिस्ट

तिने पुढे लिहिलेय की,"लढाई जिंकण्याची मी एकही संधी सोडत नाही. माझे केस गळण्यापूर्वीच मी ते कापण्याचा निर्णय घेतला. केस गेल्यानंतर रडण्यापेक्षा मी आधीच केस कापले. कारण माझं मुकूट हे माझी जिद्द, माझं बळ आणि माझं स्वत:वर असलेलं प्रेम यातच आहे. आणि हो, मी माझे हेच केस मी या प्रवासात विग म्हणून वापरणार आहे. केस परत येतील, भुवयाही येतील, शरीरावरचे व्रण मिटतील, पण जिद्द तशीच राहील. मी माझा हा प्रवास रेकॉर्ड करणार आहे जेणेकरुन माझ्यासारख्याच इतरांनाही यातून बळ मिळेल. या दिवशी माझ्यासोबत असणारे रॉकी, माझी आई सर्वांचे आभार. देव मला कॅन्सरसोबत लढण्याची ताकद देवो. त्यातून मी नक्कीच जिंकेल. चाहत्यांनो माझ्यासाठी प्रार्थना करा."

Hina Khan: अभिनेत्री हिना खानने गळण्याआधीच कापले केस, लेकीची अवस्था पाहून आई ढसा ढसा रडली, पाहा VIDEO
Anant- Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात, 'मामेरू' विधीमध्ये अंबानी- मर्चंट कुटुंबियांची उपस्थिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com