Anant- Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात, 'मामेरू' विधीमध्ये अंबानी- मर्चंट कुटुंबियांची उपस्थिती

Anant- Radhika Wedding Begins Ritual : अनंत- राधिकाच्या लग्नाच्या आधीच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नातील महत्वाच्या विधींपैकी एक समजली जाणाऱ्या 'मामेरू' विधी पार पडली.
Anant- Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात, 'मामेरू' विधीमध्ये अंबानी- मर्चंट कुटुंबियांची उपस्थिती
Anant- Radhika Wedding Begins RitualSaam Tv

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नविधीची सुरुवात गरीब मुलींच्या सामुहिक विवाहांनी झाली. राज्यातील पालघर जिल्ह्यामध्ये अंबानी कुटुंबाने आयोजित केलेल्या ५० हून अधिक गरीब मुलींचा सामुहिक लग्नसोहळा पार पडला आहे. नुकताच काल रात्री मुंबईमध्ये अनंत- राधिकाच्या लग्नाच्या आधीच्या विधीचे आयोजन करण्यात आले होते. लग्नातील महत्वाच्या विधींपैकी एक समजली जाणाऱ्या 'मामेरू' विधी पार पडली. या कार्यक्रमाचे जंगी पद्धतीने सेलिब्रेशन करण्यात आले असून कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Anant- Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात, 'मामेरू' विधीमध्ये अंबानी- मर्चंट कुटुंबियांची उपस्थिती
प्रभास- दीपिकाच्या Kalki 2898 AD ची जगभरामध्ये क्रेझ, गाठला ७०० कोटींचा टप्पा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न येत्या १२ जुलै रोजी मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. 'मामेरू' सोहळा दरम्यान अंबानी कुटुंबिय सर्व पाहुण्यांचं स्वागत करताना दिसले. अनंत- राधिकाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाने दोन प्री-वेडिंग फंक्शन्स आयोजित केले होते. काल (३ जुलै) अंबानी कुटुंबीयांच्या घरी 'मामेरू' विधी पार पडला. यावेळी अंबानी आणि मर्चंट कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये नीता अंबानी आपल्या आई आणि वहिनींना मिठाई खाऊ घालताना दिसल्या.

विरल भयानी या पापाराझी इन्स्टा चॅनलवर कार्यक्रमादरम्यानचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी कार्यक्रमाला धीरज अंबानीही आपल्या फॅमिलीसोबत उपस्थित राहिले होते. 'मामेरू' विधी दरम्यान मुकेश अंबानी आपल्या नातवंडांसोबत टाईम स्पेंड करताना दिसले. नातवंडांना कडेवर घेऊन मुकेश अंबानी स्पॉट झाले होते. इव्हेंट दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून राधिका मर्चंटच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या कार्यक्रमासाठी फार जास्त कोणी बॉलिवूड सेलिब्रिटी दिसले नाहीत. मात्र अनेक बॉलिवूड स्टार किड्स बेस्ट फ्रेंड असलेला ऑरीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Anant- Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात, 'मामेरू' विधीमध्ये अंबानी- मर्चंट कुटुंबियांची उपस्थिती
Smriti Biswas: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं नाशिकमध्ये निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com