प्रभास- दीपिकाच्या Kalki 2898 AD ची जगभरामध्ये क्रेझ, गाठला ७०० कोटींचा टप्पा

Kalki 2898 AD 7th Day Collection : ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाचा फक्त देशभरातच नाही तर जगभरात जलवा पाहायला मिळत आहे. चित्रपटाने जबरदस्त कमाई करत चित्रपटाच्या निर्मितीचाही खर्च वसूल केलेला आहे.
प्रभास- दीपिकाच्या Kalki 2898 AD ची जगभरामध्ये क्रेझ, गाठला ७०० कोटींचा टप्पा
Kalki 2898 AD Box Office CollectionInstagram

‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) चित्रपटाचा फक्त देशभरातच नाही तर जगभरात जलवा पाहायला मिळत आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने जबरदस्त कमाई करत चित्रपटाच्या निर्मितीचाही खर्च वसूल केलेला आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण असून यांच्यासोबत दाक्षिणात्य कलाकारांचीही दमदार फळी पाहायला मिळत आहे. चित्रपटाने जगभरामध्ये ६०० कोटींहून अधिकची कमाई केलेली असून चित्रपटाच्या कमाईबद्दल जाणून घेऊया...

प्रभास- दीपिकाच्या Kalki 2898 AD ची जगभरामध्ये क्रेझ, गाठला ७०० कोटींचा टप्पा
Smriti Biswas: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं नाशिकमध्ये निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

६०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाची देशभरासह जगभरामध्ये जोरदार कमाई सुरू आहे. चित्रपटाने एका आठवड्यात देशभरामध्ये, ३९३ कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरामध्ये ७०० कोटींची कमाई केलेली आहे. ही सर्वाधिक कमाई असून चित्रपट लवकरच १००० कोटीही पार करेल. 'जवान'नंतर सर्वाधिक कमाई करण्याच्या यादीमध्ये 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाचाही समावेश होण्याची शक्यता आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशीच सर्वाधिक कमाई केलेली होती. पण त्यानंतर चित्रपटाने थोडी कमीच कमाई केलेली दिसत आहे. सायफाय चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भगवान विष्णू यांचा दहावा अवतार असलेल्या कल्कीवर आधारित हा चित्रपट आहे. २०२४ मधील बिगबजेट चित्रपटांच्या यादीत ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाचा समावेश झालेला आहे. चित्रपटामध्ये AI टेक्नोलॉजी, ग्राफिक्स, ॲनिमेशन सारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे.

प्रभास- दीपिकाच्या Kalki 2898 AD ची जगभरामध्ये क्रेझ, गाठला ७०० कोटींचा टप्पा
Rajeshwari Kharat Post: फॅन्ड्री चित्रपटातील शालूला मिळाला 'जब्या'; फोटोमधील तो मुलगा नेमका कोण?

2D सोबतच हा चित्रपट IMAX आणि 3D फॉर्मेटमध्येही रिलीज झालेला आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दुल्कर सलमान, कमल हसन, दिशा पटानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. प्रेक्षक, सेलिब्रिटी आणि समीक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

प्रभास- दीपिकाच्या Kalki 2898 AD ची जगभरामध्ये क्रेझ, गाठला ७०० कोटींचा टप्पा
Kakuda Movie Relased Date: मुंज्यानंतर आता 'ककुडा'... आदित्य सरपोतदारचा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमाही बॉक्स ऑफिस गाजवणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com