Smriti Biswas: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं नाशिकमध्ये निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Smriti Biswas Passes Away: बॉलिवूडची मॉडर्न गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Smriti Biswas:
Smriti Biswas:SaamTv

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचे निधन झाले आहे. एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे निधन झाल्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बुधवारी रात्री नाशिक रोड येथील चव्हाण मळ्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्मृती विश्वास नारंग यांचे वय १०१ वर्ष होते.

Smriti Biswas:
Rajeshwari Kharat Post: फॅन्ड्री चित्रपटातील शालूला मिळाला 'जब्या'; फोटोमधील तो मुलगा नेमका कोण?

स्मृती विश्वास यांनी आपल्या सहाबहार अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मने जिंकली होती. स्मृती यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९२४ रोजी बांग्लादेशमधील ढाकाजवळील भरोसापूर येथे झाला. त्यांनी आता पर्यंत ९२ हिंदी चित्रपटात काम केले आहे. स्मृती विश्वास यांचे पती एस.डी. नारंग हे चित्रपट निर्माते होते. त्यांनीदेखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्मृती विश्वास नारंग यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

स्मृती विश्वास नारंग यांच्या पश्चात दोन मुले आणि एक बहिण आहे. स्मृती विश्वास यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.सारडा सर्कल येथील ख्रिस्ती स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

स्मृती विश्वास नारंग यांनी आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांनी राज बब्बर, सुनील दत्त, हेमा मालिनी, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन या कलाकारांसोबत काम केले आहे.sa

Smriti Biswas:
Sai Tamhankar : तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल; सई ताम्हणकरणं सांगितला विचित्र प्रसंग, मुलाखतीत बरेच धक्कादायक खुलासे

काही दिवसांपूर्वी स्मृती यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती. स्मृती यांचे पती एस. डी. नारंग यांनी एका चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहरी यांच्या आवाजातील गाणे लावून घेतली.परंतु हा चित्रपट पूर्ण झाला नाही. या चित्रपटाचे सर्व हक्क स्मृती विश्वास यांच्याकडे होते. त्यांनी उदरनिर्वाहासाठी २०२३ मध्ये पंधरा हजारात ही तिन्ही गाणी विकली.

Smriti Biswas:
Bharti Singh Net Worth: कॉमेडियन भारती सिंहची संपत्ती माहितीये का? आकडा पाहून व्हाल थक्क; वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com