Rajeshwari Kharat Post: फॅन्ड्री चित्रपटातील शालूला मिळाला 'जब्या'; फोटोमधील तो मुलगा नेमका कोण?

fandry actress rajeshwari kharat post: राजेश्वरीने एका मुलासोबत फोटो पोस्ट केला आहे.दोघांनीही मॅचिक लूक केला आहे. फोटोंला रेड हॉर्ट इमोजी कॅप्शन दिलं आहे.
Rajeshwari Kharat Post
Rajeshwari Kharat Post

कांचन सोनावणे

नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री (Fandry) या चित्रपटातील अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या लाईमलाईटमध्ये आहे. उत्तम अभिनय कौशल्याने अत्यंत कमी कालावधीत राजेश्वरीने प्रेक्षकांची मने जिंकली. फॅन्ड्री हा चित्रपट ११ वर्षांपूर्वी प्रेकक्षकांच्या भेटीला आला होता. फॅन्ड्री चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात हे नवखे कलाकार झळकले होते. चित्रपटात 'शालू' ह्या राजेश्वरीच्या भूमिकेला चांगलीच पंसती मिळाली. आता पुन्हा अभिनेत्री चर्चेचा विषय ठरली आहे.आजही सोमनात आणि राजेश्वरीचा उल्लेख चित्रपटातील नावानेच केला जातो. (Marathi Entertainment News)

Rajeshwari Kharat Post
मुंज्यानंतर आता 'ककुडा'... आदित्य सरपोतदारचा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमाही बॉक्स ऑफिस गाजवणार?

अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चर्चेत असते. राजेश्वरीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अंकाउटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये राजेश्वरी एका मुलासोबत दिसत आहे.फोटो शेअर करत राजेश्वरीने हार्ट इमोजी असं कॅप्शन दिलं आहे. राजेश्वरीच्या फोटोंवरील कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

पोस्ट काय आहे?

राजेश्वरीने एका मुलासोबत फोटो पोस्ट केला आहे.दोघांनीही मॅचिक लूक केला आहे. फोटोंला रेड हॉर्ट इमोजी कॅप्शन दिलं आहे.राजेश्वरीने शेअर केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर ती रिलेशनशीपमध्ये असल्याची एकच चर्चा सुरू आहे.

राजेश्वरीने यापूर्वी सोमनात अवघडेसह फोटो सोशल मिडीयावर शेअर केला होता. तेव्हा देखील त्या फोटो बद्दल नेटकऱ्यांनी चागल्यांच कंमेटस केल्या होत्या. पण आता राजेश्वरीने शेअर केलेल्या त्या फोटोमुळे तिचे सगळेच चाहते संभ्रमात पडले आहेत.

सोशल मीडियावर राजेश्वरीच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. नेटकऱ्यांनी शालुला तिच्या खऱ्या आयुष्यातील जब्या मिळ्याल्याच म्हटलं आहे. तर राजेश्वरी आता या तरूणाला डेट करत असल्याच बोलल जातयं. रोहन गवई अंस या तरूणाच नाव असून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पोस्ट असल्याचं बोललं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com