बॉलिवूडमधील कॉमेडी क्वीन म्हणून भारती सिंहला ओळखले जाते. भारती आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.
भारतीचा जन्म ३ जुलै १९८४ रोजी पंजाबमध्ये अमृतसर येथे झाला. भारतीचे बालपण अत्यंत गरीबीत गेले.
भारतीला तिच्या लठ्ठपणामुळे नेहमी चिडवण्यात आले. तिला लठ्ठपणामुळे अनेक शोसाठी नाकारण्यात आले.
भारतीला इंडस्ट्रीत कामाची पहिली संधी सुदेश लहरी यांनी दिली. त्यानंतर कपिल शर्मा शोमधून भारती घराघरात पोहचली.
भारती सिंह आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. भारतीच्या वडिलांचे ती दोन वर्षांची असतानाच निधन झाले.
तिच्या आईने घरोघरी काम करुन भारतीला मोठे केले आहे. भारतीने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोमध्ये भाग घेतला. या शोमधूनच ती घराघरात पोहचली.
भारतीने २००८ पासून आतापर्यंत ४० पेक्षा जास्त शो होस्ट केले आहेत. भारतीने 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्येदेखील स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.
मिडिया रिपोर्टनुसार, भारती आज ३ मिलियनची मालकीण आहे. त्याचसोबत भारतीचे मुंबईत स्वतः चे आलिशान घर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.