Palghar- Vasai Accident: पालघर-वसईमध्ये ३ विचित्र अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

Palghar Accident Update: पालघर - विक्रमगड - पाली- वाडा मार्गावर विचित्र अपघात झाला. भरधाव ट्रकने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक महिला आणि एक पुरूष अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Palghar- Vasai Accident: पालघर-वसईमध्ये ३ विचित्र अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू
Palghar- Vasai AccidentSaam Tv

पालघर आणि वसईमध्ये भीषण अपघात (Palghar And Vasai Accident) झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ३ वेगवेगळ्या विचित्र अपघातामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या तिन्ही अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पालघर - विक्रमगड - पाली- वाडा मार्गावर विचित्र अपघात झाला. भरधाव ट्रकने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक महिला आणि एक पुरूष अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने दोन बाईक, बस आणि कारला जोरात धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या अपघातामध्ये सहाही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर भरधाव ट्रक रस्त्यावर पलटी झाल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

Palghar- Vasai Accident: पालघर-वसईमध्ये ३ विचित्र अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्ट बदलला; ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

वसई-विरारमध्ये सोमवारी ११ च्या सुमारास दोन ठिकाणी अपघात झाला. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. अनियंत्रित डंपरने दिलेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातामध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. वसई पूर्वेच्या सातिवली खिंडीजवळ अपघाताची ही घटना घडली. डंपरचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने दोन महिलांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामधील एक महिला डंपरखाली आली तर दूसरी महिला दूर फेकली गेली.

Palghar- Vasai Accident: पालघर-वसईमध्ये ३ विचित्र अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाढ झोपेतच डंपरने मजूरांना चिरडलं; १ ठार २ गंभीर

या अपघातामध्ये रंजिता सरोज (३३ वर्षे) आणि बिंदादेवी सिंग (५० वर्षे) अशी मृत्यू झालेल्या महिलेंची नावं आहेत. वालीव पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे. तर दुसरा अपघात हा सोमवारी सकाळी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मालजी पाड्याजवळील रॉयल गार्डन येथे झाला. डंपरने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Palghar- Vasai Accident: पालघर-वसईमध्ये ३ विचित्र अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाढ झोपेतच डंपरने मजूरांना चिरडलं; १ ठार २ गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com