Prostate Cancer: धोक्याची घंटा! चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवतोय प्रोस्टेट कॅन्सर? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Prostate Cancer Symptoms: बदलते हवामान आणि जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे प्रोटेस्ट कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घ्यायला हवी.
Prostate Cancer
Prostate CancerGoogle
Published On

सध्या बदलते हवामान आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजारपण वाढत आहे. यामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. पूर्वीच्या काळात फक्त काही लोकांनाच कर्करोगासारखा आजार होत होता. मात्र, आता तरुण पिढीलादेखील कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

सध्या, ६५ वर्षांवरील नाही तर, चाळीशीतील पुरुषांना देखील प्रोस्टेट कर्करोगाचे निदान होत आहे. पुरुष आरोग्य सप्ताहानिमित्त चैत्रा देशपांडे (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा) सांगतात की, वेळीच निदान आणि उपचार केल्यास या कर्करोगावर मात करता येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन [ PSA] ही एक ब्लड टेस्ट करावी लागते. यामध्ये तुमच्या पीएसएची पातळी मोजली जाते. त्यामुशे प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता लवकर समजण्यास मदत होऊ शकते.

Prostate Cancer
Udaipur Place To Visit: सुट्टीत राजेशाही थाट अनुभवा, उदयपूर मधील 'या' निसर्गरम्य ठिकाणांची सफर करा..

जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीमधील पेशी अनियंत्रितरित्या वाढतात तेव्हा हा कॅन्सर तयार होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झालेल्या पुरुषांची संख्या २०४० पर्यंत दुप्पट होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. यानुसार वार्षिक प्रोस्टेट प्रकरणे २०२० मध्ये १.४ दशलक्ष वरून २०४० मध्ये २.९ दशलक्ष पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. भारतात दरवर्षी अंदाजे ३३,००० ते ४२,००० नवीन प्रकरणाची नोंद होते.

हा ६५ वर्षाहून अधिक वयाच्या वयस्कर पुरुषांमधील आजार असल्याचे मानले जात आहे तरीही आता ४० वर्षीय लोकांना हा आजार होत असल्याचे दिसत आहे. अनुवांशिकता, वैद्यकीय इतिहास, वाढते वय, धूम्रपानाच्या सवयी, आहाराच्या चूकीच्या सवयी यामुळे प्रोस्टेट कर्करोग होऊ शकतोय.

सुरुवातीच्या टप्प्यात, काही व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याची माहिती डॉ. चैत्रा देशपांडे(रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा) यांनी दिली.जसजसा कर्करोग वाढत जातो, तसतसे पुरुषांना ओटीपोटापासून खालील भागात अस्वस्थता जाणवणे, लघवी करताना अडचणी येतात जसे की वेदना किंवा जळजळ होणे किंवा लघवीचा प्रवाह कमी होणे, लघवीवाटे रक्त येणे (हेमॅटुरिया) आणि हाडांमध्ये वेदना यासारखी लक्षणे दिसून येतात.

Prostate Cancer
Angarki Chaturthi 2024 : अंगारकी संकष्टी निमित्त उपवासाला बनवा रताळ्याची खीर, जाणून घ्या सोपी रेसिपी...

दर महिन्याला ओपीडीमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे ३-४ रुग्ण आढळून येतात. प्रोस्टेट कर्करोगाचे वेळीच निदान झाल्याने हा आजार बरा होऊ शकतो. त्यासाठी पीएसए टेस्ट करायला हवी. प्रोस्टेट कॅन्सरला तोंड देण्याच्या आव्हानांसाठी रेडिएशन, शस्त्रक्रिया, हार्मोन थेरपी किंवा केमोथेरपीचा समावेश असलेल्या बहु-अनुशासनात्मक पद्धतींची आवश्यकता भासते आणि मुख्यत्वे ग्रामीण भागात हा रोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोधण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचेही डॉ देशपांडे यांनी स्पष्ट केले.

Prostate Cancer
Passport: पासपोर्ट बनवणे होणार सोपे; व्हेरिफिकेशनवेळी नाही चालणार पोलिसांची 'दादागिरी'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com