Angarki Chaturthi 2024 : अंगारकी संकष्टी निमित्त उपवासाला बनवा रताळ्याची खीर, जाणून घ्या सोपी रेसिपी...

Angarki Chaturthi Special Recipe : आज अंगारकी संकष्टीला बनवा गोड रताळ्याची खीर. जाणून घ्या रेसिपी...
Angarki Chaturthi Special Recipe
Angarki Chaturthi 2024SAAM TV

हिंदू धर्माचे आराध्य दैवत गणपती. आज २५ जून २०२४ रोजी कृष्ण पक्षातील अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे. या दिवशी उपवास करून गणेशाची पूजा केली जाते. कुटुंबाच्या सुखशांती, समृद्धीसाठी हे व्रत केले जाते. व्रत म्हणजे उपवास आला. नेहमी उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर या अंगारकी संकष्टीच्या उपवासाला 'हा' नवा पदार्थ घरी ट्राय करा. तुमचे पोटही भरेल आणि एक नवीन चव चाखायला मिळेल.

आज अंगारकी संकष्टीला रताळ्याची खीर बनवा. रताळी आरोग्यासाठी उत्तम असतात. उकडलेली रताळी खायला सुद्धा अधिक रुचकर लागतात. उपवासाला देखील रताळी खाली जातात. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. चला तर मग उपवासाला खाता येणारी गोड रताळ्याची खीर बनवायची रेसिपी जाणून घ्या..

गोड रताळ्याची खीर बनवण्यासाठी साहित्य

  • उकडलेले रताळे

  • साखर

  • गूळ

  • सुकामेवा

  • तूप

  • दूध

  • जायफळ पूड

  • वेलची पूड

Angarki Chaturthi Special Recipe
Rock Sugar Benefits: गोड गोड खडीसाखर अनेक आजारांवर ठरते गुणकारी

रताळ्याची खीर बनवण्याची कृती

अंगारकी संकष्टीला गोडधोड उपवासाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळ्याची साल काढून छान उकडवून घ्या. त्यानंतर रताळी कुसकरून घ्या. आता एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात कुस्करलेली रताळी दूध टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यात थोडी साखर आणि गूळ घाला. साखर-गूळ छान विरघळेपर्यंत खीर ढवळत राहा. त्यानंतर यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. खीर छान शिजल्यावर तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुकामेवा घाला. अशाप्रकारे तुमची उपवासाची स्वादिष्ट रताळ्याची खीर तयार झाली.

Angarki Chaturthi Special Recipe
Leftover Chapati : उरलेल्या चपात्यांपासून बनवा तंदूरी पनीर रॅप, विसराल रेस्टॉरंटची चव..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com