चांगल्या आरोग्यासाठी दूध पिणे हे कायम फायदेशीर असते हे सर्वांना माहिती आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का साधारण दुधात तुम्ही काही बदाम टाकून प्यायले तर त्याचे प्रत्येकाच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
दूधात आणि बदाममध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक आढळतात. अनेकदा डॉक्टरही सकाळी उठल्यानंतर बदाम खाण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? बदाम दूध प्यायल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. यामुळे हाडे मजबूत होतात. एवढेच नाही तर बदामाचे दूध प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांमधून सुटका मिळते
दुधात तसेच बदाममध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात शिवाय कॅल्शियम ,प्रथिने आणि मॅग्नेशियमचे प्रमाण आढळून येते. या सर्वांबरोबर बदामामध्ये व्हिटॅमिन ई(Vitamin-E) ,फायबरही आढळते.
दूध आणि बदाम यांचे एकत्र सेवन करणे हे प्रत्येकाच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. बदामामध्ये आढळत असलेले व्हिटॅमिन ई हे त्वचा चमकदार बनवते आणि केसांची वाढ होण्यास मदत करतात.
हाडांचे आरोग्य- बदामाचे दूध प्यायल्याने तु्मची हाडे मजबूत होण्यास मदत होते. ज्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी असते,त्याही व्यक्तींनी बदामाचे दूध प्यावे.
प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी दररोज बदामाच्या दूधाचा आहारात समावेश करावा. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
बदामाचे दूध कधी प्यावे हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असेल. त्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तसेच सकाळी उठल्यानंतर बदामाच्या दूधाचे सेवन करा. एक ग्लास दुधात ४-५ बदाम वाटून टाका. त्यासाठी दूधी गरम दूधाचा वापर करा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा