ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उकडलेले जांभळे रताळे, उकडलेले बटाटे, भिजवलेला साबुदाणा, बारीक वाटलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, आले पेस्ट, दही, मीठ, चवीनुसार साखर, लिंबाचा रस
एका बाऊलमध्ये उकडलेले रताळे आणि बटाटे स्मॅश करा. त्यानंतर त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घाला.
मीठ, साखर, दही, शेंगदाणा पावडर आणि लिंबाचा रस घालून एकत्र मिक्स करून घ्या.
आता मूठभर मिश्रण घेउन त्याचे थालीपीठ थापून घ्या.
त्यानंतर थालीपीठ पॅनमध्ये मंद आचेवर तूप लावून खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्या.
थालीपीठ दोन्ही बाजूंनी कुरकुरीत गोल्डन ब्राऊन झल्यावर सर्व्हविंग प्लेटमध्ये काढून घ्या
थालीपीठ गोड दहीसोबत सर्व्ह करा. तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने उपवासाचं थालीपीठ तयार आहे.