Chetan Bodke
वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच रोजच्या आहारात विविध ड्रिंक्सचा समावेश करू शकता
सकाळी उठल्या उठल्या काही खाण्याआधी पुढीलप्रमाणे ज्युस पिल्याने वेटलॉस आणि विशेष म्हणजे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करायचे असेल तर दिवसाची सुरुवात लिंबू पाणी पिऊन करावा. लिंबू पाणी पिल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म बूस्ट होते.
ग्रीन टीमध्ये मोठ्याप्रमाणावर ॲन्टीऑक्सिडंट असते. त्यामुळे पचन क्षमता सुधारते. ग्रीन टी पिल्यास चरबी आणि वजनही कमी होते.
रोज रात्री झोपताना एक कप पाण्यात एक चमचा जीरे भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
कोरा चहा म्हणजेच दूध न टाकता चहा बनवा. त्यात लिंबूरस आणि अद्रक किसून ॲड करा. त्याने देखील बेली फॅट कमी होतं.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.