Chetan Bodke
मधुमेहाच्या आजाराने सगळ्या वयोगटातील तरुण त्रस्त असून भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
बदलेल्या जीवनशैलीमुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वारंवार वाढत असेल तर आहारात बदल करायला हवा.
जाणून घेऊया, रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवता येईल.
पालकमध्ये जीवनसत्त्वे आणि अमीनो ऍसिडसह अनेक घटक आहेत. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
कारल्याचा रस आणि पाणी रक्तातील साखेरची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी चांगले आहे. यात इन्सुलिन सारखा घटक पॉलीपेप्टाइड पी आढळतो.
दुधीभोपळ्यामध्ये फायबर असते, यामध्ये आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. यात असणारे कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेहाच्या आजारावर काही प्रमाणात मात करता येईल.
कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई, सी आणि आवश्यक अँटिऑक्सिडंट्सने असतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायचे असेल तर, कोरफडचा रस पिऊ शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.