Chetan Bodke
बदलेली जीवनशैली, कामाच्या पद्धती, सततचा ताण यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा सारखे अनेक अनेक गंभीर आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
वाढते आजार पाहून आपल्या रोजच्या जीवनशैलीत बदल करायला हवा, जाणून घेऊया रोजच्या जीवनशैलीतील ५ सवयींबद्दल
सकाळी उठल्यानंतर अनेकांना मोबाईल वापरण्याची सवय असते. आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर सकाळी काही वेळ मोबाईलपासून दूर राहा.
निरोगी राहायचे असेल तर रोज सकाळी किमान अर्धा तास योगासने, प्राणायाम किंवा जिम वर्कआऊट करण्याची सवय लावा.
जेवल्यानंतर चालण्याची सवय लावा. सतत एकाच जागी काम करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. खाल्ल्यानंतर १० मिनिटे चाला. पोट आणि आतडे क्रियाशील होतात.
काम आणि धावपळ यात संतुलन राखून तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता. शरीरात शरीरात उत्सर्जित होणारी एंडोर्फिन आणि सेरोटोनिन यांसारखी फील-गुड रसायने वेदनापासून आराम देतात.
जे लोक तासनतास बसून काम करतात त्यांनी त्यांचे आरोग्य जपायला हवे. जास्त वेळ उभे राहणे आणि बसणे टाळावे.
सदर माहिती सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.