Chetan Bodke
पुदिना आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये अनेक पौष्टिक घटकांसोबत औषधी गुणधर्म आहेत.
उन्हाळ्यामध्ये जर पुदिन्याचा रोजच्या आहारत समावेश केला तर, त्याचा शरीराला खूप फायदा होतो.
उन्हाळ्यात अनेक पेयांमध्ये पुदिना टाकला जातो. त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घेऊया पुदिन्याच्या पाण्याचे फायदे
पुदिन्यामध्ये व्हिटामिन ए आणि सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट असे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे पुदिन्याचे पाणी पिल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे
मोशन सिकनेस किंवा मळमळ होत असेल तर उन्हाळ्यात पुदिन्याच्या पाण्याचे सेवन करा.
पुदीन्यामध्ये मेन्थॉल आणि रोझमॅरिनिक ॲसिडसारखे अँटिऑक्सिडंट आढळतात. यामुळे आपल्या शरीरातील तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.
पुदिन्यात व्हिटॅमिन सी आणि ए, लोह भरपूर असते. जे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवते आणि कोणत्याही आजारापासून आपला बचाव करते.
तणाव कमी करण्यासाठी पुदिन्याचे पाणी फायदेशीर आहे. त्यामुळे हे प्यायल्याने शरीराला आराम मिळतो.
सदर माहिती सामान्य माहितीसाठी आहे.