Chetan Bodke
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या काळात आपल्याला चेहऱ्यांचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला जातो.
उन्हाळात सूर्याच्या किरणांमुळे आणि घामामुळे त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचा काळा पडतो.
उन्हाळ्यात डागरहित आणि चमकदार त्वचा हवी असल्यास पुढील ४ टीप्स लक्षात ठेवा.
उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळा चेहरा धुणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा त्वचेचा प्रकारही समजून घ्यावा लागेल. त्यानुसार फेस वॉश निवडा.
सनस्क्रिनचा वापर प्रत्येक ऋतूत करायला हवा. उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनिल किरणांपासून तुमचे रक्षण करत नाही तर प्रदूषण आणि इतर गोष्टींपासूनही तुमचे रक्षण करते.
उन्हाळ्यात त्वचेचला एक्सफोलिएट करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्या त्वचेचा प्रकारानुसार स्क्रब निवडा.
उन्हाळ्यात त्वचेला डिहायड्रेट होण्यापासून थांबवा. यासाठी दिवसातून किमान ४ ते ५ लिटर पाणी प्या. यामुळे त्वचा सुधारेलच आणि पिंपल्सच्या समस्येपासून सुटका होईल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा