Chetan Bodke
उन्हाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते.
उन्हाळ्यात आपल्याला सर्वत्र जांभूळ पाहायला मिळतात. याचे सेवन केल्याने शरीराला खूप फायदे होतात.
जांभूळमध्ये लोह, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
जांभूळ फळामध्ये पोषक जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ अतिशय फायदेशीर मानले जाते.
जांभूळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. यात असणारे ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका सर्वाधिक असतो. या दिवसात घाम जास्त येतो. याशिवाय हवामान गरम असते. शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते.
शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी जांभाळाचा फायदा होतो. यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे रक्त शुद्ध होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
जांभळाच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. यामुळे उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.