Chetan Bodke
वाढते वजन ही एक समस्या आहे. बरेचदा याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, सतत वाढणारे वजन हे थायरॉईडचे कारण देखील असू शकते.
बदलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे थायरॉईड हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो.
थायरॉईड ही आपल्या मानेच्या खालच्या भागात असलेली एक ग्रंथी आहे जी शरीरातील थायरॉईड नावाच्या संप्रेरकाला नियंत्रित करते. याच्या वाढीमुळे किंवा कमी झाल्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू लागतात.
सी फूडमध्ये आयोडीनचा चांगला स्त्रोत आहे. रोजच्या आहारात सूप आणि सॅलडच्या रुपात याचा समावेश करा. याचे सेवन केल्याने थायरॉईड ग्रंथी चांगले कार्य करते.
कॉड, ट्यूना आणि सॅल्मनसारख्या फिशमध्ये आयोडीन असते. या माशांचे सेवन केल्याने ओमेगा-३ फॅटी ॲसिडसह आयोडीनचा पुरवठा होतो.
दूध, दही, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये आयोडीन जास्त आढळते. याशिवाय मीठ हा आयोडीनचा चांगला स्त्रोत आहे.
अंड्यांमध्ये आयोडीनसह अनेक पोषक घटक आढळतात. यामध्ये सेलेनियम आणि झिंक देखील अंड्यांमध्ये आढळते. जे थायरॉईडला चांगले कार्य करण्यास मदत करतात.
थायरॉइड रुग्णांसाठी नारळ गुणकारी आहे. नारळामध्ये मीडियम चेन फॅटी ॲसिड आणि मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे थायरॉइड नियंत्रणात राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.