Chetan Bodke
बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच वाढत्या वजनाचा त्रास सहन करावा लागतो. जॉबमुळे वाढत्या वजनासोबतच बद्धकोष्ठतेच्या समस्येचाही सामना करावा लागतो.
लठ्ठपणांचा वाढता आजार हा सर्वांमध्येच आढळून येत आहे. लठ्ठपणापासून स्वत:ला वाचवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कलिंगडचे सेवन करा.
कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. कलिगंडमध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. याचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
कलिगंडमध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. जे तुम्हाला दीर्घकाळ हायड्रेट ठेवते. यामुळे तुमचे पोट भरलेले राहते.
लाइकोपीन हे शक्तीशाली अँटिऑक्सिडेंट आहे. जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते.
कमी कॅलरी असल्यामुळे आणि साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे कलिंगड हे आरोग्यासाठी चांगला पर्याय आहे. यामुळे वजन कमी होते.
कलिंगडमध्ये अधिक फायबर असते, त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि पचनक्रिया सुधारते. सोबतच वजन कमी करण्यास मदत करते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.