Chetan Bodke
उन्हाळा सुरु झाला की, शरीराला अधिक गारव्याची गरज असते.
उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उष्माघात, डायरिया, टायफॉइड यांसारख्या समस्या खूप सामान्य असल्या तरी त्यांचा शरीरावर खूप गंभीर आणि दीर्घकाळ परिणाम होतो.
रोजच्या आहारात लिंबूपाणी, शिकंजी सरबत, सत्तू, उसाचा रसचा समावेश करा. यामध्ये बडीशेपचे पाणीही शरीराला फायदेशीर ठरु शकते.
बडीशेप शरीराला गारवा देते याचे पाणी प्यायल्याने शरीर थंड राहते.
यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. याचे सेवन केल्याने शरीरातील डिहायड्रेशनची समस्या देखील टाळता येते.
बडीशेपच्या पाण्याचे दररोज सेवन केल्यामुळे इम्युनिटी सिस्टिम वाढते.
बडीशेपमध्ये जास्त प्रमाणात पॉटेशियम असते. त्यामुळे शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी करते आणि हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवते.
बडीशेपचं पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. नियमित सकाळी पाण्याचे सेवन केल्यास मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.