Chetan Bodke
उन्हाळ्यात अनेकांना सर्वाधिक जास्त समस्या जाणवते ती डिहायड्रेशनची.
उन्हाळ्यात हायड्रेट राहाण्यासाठी आपण कोल्ड ड्रिंकचे सेवन करतो. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
मधुमेहाचे रुग्ण असाल तर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अशावेळी, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या ड्रिंक्सचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया...
ग्रीन टी अँटिऑक्सिडंटने समृद्ध आहे. यामध्ये इन्सुलिन असते. लिंबाच्या रसात मिसळल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
काकडीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. काकडी आणि पुदिन्याचे पाने असं ड्रिंक प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
टरबूज हे नैसर्गिकरित्या गोड आणि हायड्रेटिंग आहे. तुळशीत अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. याचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये राहाते.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट राहण्यासाठी नारळपाणी हा चांगला पर्याय आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.