Chetan Bodke
सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात आधी चहा-कॉफीचे सेवन करतो. जर तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर दैनंदिन दिनर्चेयत बदल करायला हवे.
सकाळी रिकाम्या पोटी चिकू खाल्ल्याने मेंदूसाठीच नाही तर पोटाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे
चिकूमध्ये प्रथिने, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमिन बी, ई, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
चिकूमध्ये आढळणारा फायबर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच पचनसंस्था निरोगी राहते.
रिकाम्या पोटी चिकू खाल्ल्याने कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
चिकूमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
चिकूमुळे वजन कमी करण्यास मदत होते. यात असणारे फायबर आरोग्यासाठी चांगले असतात. रिकाम्या पोटी खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
चिकूमध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. हे स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी वाढवण्यापासून रोखते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.