Chetan Bodke
उन्हाळा सुरू झालं की, वेध लागतात ते म्हणजे आंबे, करवंद आणि जांभूळ खाण्याचे.
कडाक्याच्या उन्हाळ्यात कैरीपासून विविध पदार्थ बनवून खाल्ले जातात. जेवणासोबत लोणचे, कॅन्डी, मुरंबा, कैरी मसाला अशा अनेक पदार्थांची चव चाखायला मिळते.
कच्ची कैरी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कैरीपासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्याने किंवा कच्ची कैरी खाल्ल्याने शरीरासाठी फायदे आहेत, जाणून घेऊया.
कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. उन्हाळ्यात जर थकवा जाणवत असेल तर कैरीचे सेवन करावे.
कैरी खाल्ल्याने उष्माघातापासून संरक्षण होते. कडाक्याच्या उन्हात तुम्ही कैरीचं पन्ह प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. तसेच शरीराचे डिहायड्रेशनपासून बचाव होतो.
कैरी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन आणि बध्दकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खा.
इतर फळांच्या तुलनेने कच्ची कैरीमध्ये साखर कमी असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी कच्ची कैरी खाणे फायदेशीर आहे.
कच्च्या कैरीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात. यामुळे हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
कच्च्या कैरीमध्ये असलेल्या पॉलिफेनॉल या घटकामुळे तुमचे कॅन्सरसारख्या धोकादायक आजारपासून संरक्षण होते. सोबतच कॅन्सरपासून धोकाही कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.