Chetan Bodke
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते.
साडे तीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा होय. गुढी पाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात.
जाणून घेऊया, गुढी कशी उभारावी ?
गुढीसाठी वापरणारा कलश स्वच्छ धुऊन आणि पुसून घ्या. त्या कलशावर कुंकूने स्वास्तिक काढा.
काठीच्या टोकाला सोन्याची जर असलेली साडी बांधा. त्यानंतर गुढीला कडुलिंब, आंब्याची पाने बांधा. सोबत साखरेची माळही लावावी.
ज्या जागी गुढी उभारणार आहात, तेथे रांगोळी काढू शकता. गुढीची सर्व तयारी झाल्यानंतर हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी.
काठीच्या टोकावर तांब्या उपडा घाला. यानंतर घराबाहेर ब्रम्हध्वजाचे प्रतीक समजण्यात येणारी ही गुढी चांगल्या भावनेने आणि अतिशय सन्मानाने आणि आनंदाने तुम्ही उभारा
गुढीपाडव्याला विशेष असा मुहूर्त नसतो. सूर्योदयापासून कधीही गुढीचे पूजन घरोघरी करता येते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.