Chetan Bodke
स्वयंपाकघरात वापरत असलेल्या गोष्टींपासून कर्करोगाचा धोका वाढतो. तर आता आपण स्वयंपाक घरातील अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत.
अशा कोणत्या ४ वस्तू आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला कॅन्सरचा धोका होऊ शकतो.
स्वंयपाकघरात नॉन-स्टिक भांडी असतात. या नॉन स्टिक भांड्यांना कोट करण्यासाठी पीएफओए नावाचे रसायन वापरले जाते. पीएफओएच्या कोटिंगमुळे कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो.
स्वयंपाकघरात प्लास्टिकची भांडी आणि बाटल्या आपल्याला पाहायला मिळतात. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये 'बिस्फेनॉल ए' नावाचे रसायन आढळते. या रसायनामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
प्रत्येकाच्या घरात रोटी, पराठा, ब्रेड किंवा टिफिनमध्ये खाद्यपदार्थ पॅक करायचे असेल तर ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. त्यात गरम पदार्थ गुंडाळल्याने कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
किचनमधून केवळ प्लास्टिकच्या बाटल्या नाहीतर चॉपिंग बोर्डही फेकून द्यायला हवे. नियमित चॉपिंग बोर्डवर भाजीपाला कापल्याने प्लास्टिकचे बारीक कण भाजीत मिसळतात. ज्यामुळे पोटाचे विकार होण्याची अधिक शक्यता असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.