Chetan Bodke
दररोजच्या जीवनात आपण साखर अधिक प्रमाणात खातो. साखरेचे जास्त सेवन केल्याने मधुमेहासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते.
रक्तातील साखर वाढली किंवा कमी झाली की, उच्च रक्तदाब साखऱ्या समस्यांना निर्माण होतात.
तुम्हालाही सतत गोड पदार्थ खाण्यास आवडत असतील आणि तुम्हालाही आरोग्याची अधिक काळजी असेल तर पुढील पर्यायी पदार्थाचे सेवन करा.
रोजच्या जेवणात साखरेऐवजी गुळाचा वापर करा. यामध्ये अँटिऑक्सि़डेंटचे प्रमाण जास्त असते. गुळ आरोग्यासाठी आणि चवीसाठी उत्तम असतो. गुळामुळे आपले आरोग्य उत्तम राहते.
साखरेच्या तुलनेत खजूरमध्ये अनेक पोषक घटक असतात. खजूर अनेक प्रकारे पौष्टिक आहे. खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते. खजूरमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
आरोग्याच्या दृष्टीने कृत्रिम साखरेचा पर्याय चांगला आहे. नारळात अनेक पोषक तत्वे असतात. फायबर चांगल्या प्रमाणात असल्यामुळे ते तुमच्या आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते.
वनस्पतीच्या रसापासून बनवलेली मॅपल शुगरमध्ये कॅल्शियम, मँगनीज, लोह आणि पोटॅशियम सारखे घटक असतात. साखरेच्या तुलनेत याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.