Chetan Bodke
उन्हाळ्यात तेलकट त्वचा अधिकच चिकट होते. तेलकट त्वचा असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्वचेसंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
ज्यांची तेलकट त्वचा असते, त्यांना दिवसातून दोनदा चेहरा धुण्याचा सल्ला दिला जातो. पण तरीही सुद्धा काहींचा चेहरा तेलकट राहतो.
तेलकट त्वचेची समस्या टाळण्यासाठी तेलकट पदार्थ खाणे टाळावे. अशावेळी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा याची यादी पाहू.
पालेभाज्यांमध्ये ब्रॉकोलीचा समावेश केला जातो. ब्रोकोली त्वचेसाठी उत्कृष्ट ठरते. ब्रोकोलीचे सेवन केल्यास त्वचेच्या समस्या टाळण्यास मदत होईल.
रोजच्या जेवणामध्ये खालली जाणारी मसुरची डाळ स्किनला प्रचंड पोषण देते. मसुरच्या डाळीमध्ये अनेक महत्वाचे घटक असतात.
गाजर डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी उत्तम असते. गाजरमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे गुणधर्म आणि बीटा कॅरोटीनचं प्रमाण अधिक असते.
ज्वारी, तांदूळ, गहू धान्यांपासून बनविलेला पदार्थ शरीरासाठी फार उत्तम असतो. त्यामध्ये त्वचेसाठी उपयुक्त मॅग्नेशियम घटक असतात.
संत्री, सफरचंद सारखे फळं त्वचेसाठी उत्तम आहेत. फळांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
NEXT: जेवणामध्ये ‘या’ भाज्यांचा करा समावेश, वाढलेलं वजन राहिल नियंत्रणात