Chetan Bodke
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लहान मुलांसह वयोवृद्धांनाही वाढत्या वजनाचा सामना करावा लागतोय.
वाढलेल्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण योगासने, व्यायाम, जीम यांसारखे अनेक उपाय करतो. पण, वजन काही नियंत्रणात येत नाही.
वजन कमी करताना महत्वाचा असतो तो आहार. जर तुम्हीही वजन कमी करत असाल तर आहारात ‘या’ ५ भाज्यांचा समावेश करा.
कारले हे चवीला कडू असते. यामध्ये कमी कॅलरी असते. शरीरातील चरबी कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास कारले मदत करते.
चरबी कमी करण्यासाठी तुम्ही आहारात वांग्याचा समावेश करु शकता. वांग्यामध्ये अँटीऑक्सिंडट्स आणि अँथोसायनिन्स हे घटक असल्यामुळे वजन कमी होते.
काकडीचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स करते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण आणि फायबर जास्त असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
शिमला मिर्चीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी सोबत पाण्याचे प्रमाण अधिक असते. शिमला मिर्चीचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते.
भोपळ्यामध्ये अधिक फायबर असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यास फायदा होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.