Suraj Chavan Movie : टॉपचा पिक्चर फक्त ९९ रुपयांत, 'झापुक झुपूक' चित्रपट कुठं अन् कधी पाहाल?

Zapuk Zupuk Special Offer : सूरज चव्हाणचा धमाकेदार चित्रपट आता फक्त ९९ रुपयांत पाहता येणार आहे. कधी आणि कुठे सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Zapuk Zupuk Teaser Out
Suraj ChavanSAAM TV
Published On

सध्या बॉक्स ऑफिसवर सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) चित्रपट गाजत आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता मराठी चित्रपट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केदार शिंदेंनी पोस्ट करत या बातमीचा खुलासा केला आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट उद्या मंगळवारी म्हणजेच 29 एप्रिलला प्रेक्षकांना अवघ्या ₹99 रुपयांमध्ये (99 Rupees Movie Ticket Offer) थिएटरमध्ये पाहता येणार आहे.

केदार शिंदे यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करून नवीन ऑफर जाहीर केली आहे. याला त्यांनी एक हटके कॅप्शन देखील दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, २९ एप्रिल मंगळवार, "म्हणजे उद्याच...खास तुमच्या आख्ख्यांसाठी..'झापुक झुपूक' फक्त ९९ रुपयांत...टॉपचा पिक्चर, टॉपचा जल्लोष..." या पोस्टवर कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये ही मोठा बदल होणार आहे.

सर्वाधिक चर्चेत असलेला हा कौटुंबिक मनोरंजन देणारा मराठी चित्रपट 'झापुक झुपूक' पाहण्यासाठी आता प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे असे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहून आल्यावर चाहते सूरजच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. सूरजने आपल्या अभिनयाने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

'झापुक झुपूक' बॉक्स ऑफिस कलेक्शन

सूरजच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाने तीन दिवसांत तब्बल 67 लाख रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 24 लाख, दुसऱ्या दिवशी 24 लाख आणि तिसऱ्या दिवशी 19 लाख रुपयांची कमाई केली आहे. येत्या काळात हा चित्रपट बंपर कमाई करणार असल्याचे दिसत आहे.

Zapuk Zupuk Teaser Out
Zapuk Zupuk Box Office Collection : रिलीजच्या तिसऱ्या दिवशी सूरजची जादू फेल, 'झापुक झुपूक'च्या कमाईत घसरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com