सध्या बॉक्स ऑफिसवर हिंदी, मराठी चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी 5' चा विजेतचा सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) चित्रपट आणि महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar ) यांचा 'देवमाणूस' (Devmanus ) बॉक्स ऑफिसवर एकमेकांना तगडी टक्कर देत आहे. हे दोन्ही चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दोन्ही चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसांत किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट बॉक्श ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'झापुक झुपूक' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ग्रॉस कलेक्शन 27 लाख रुपये तर नेट कलेक्शन 24 लाख रुपये केले आहे. आता चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही 24 लाख रुपयांची कमाई केली आहे. दोन दिवसांत 'झापुक झुपूक' चित्रपटाने दोन दिवसात 48 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.
'झापुक झुपूक' चित्रपटातील सूरजच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. केदार शिंदे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सूरज चव्हाणचा 'झापूक झुपूक' चित्रपट ही प्रेमकथा आहे. या चित्रपटात सूरजसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे असे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळत आहे. रविवारी 'झापुक झुपूक' प्रेक्षकांवर किती जादू करतो पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'झापुक झुपूक' चित्रपटाला महेश मांजरेकर यांचा 'देवमाणूस' चित्रपट तगडी टक्कर देत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'देवमाणूस' चित्रपटाने पहिल्या दिवशी ग्रॉस कमाई 15 लाख रुपये तर नेट कलेक्शन 14 लाख रुपये केले आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 19 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'देवमाणूस' चित्रपटाने दोन दिवसात 33 लाख रुपये कमावले आहे. 'देवमाणूस' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे.
'देवमाणूस' चित्रपटात महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'देवमाणूस' चित्रपटात रहस्य, गूढ भावनांनी भरलेला कथा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देऊस्कर यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.