Kedar Shinde : 'झापुक झुपूक' चित्रपटाची कथा नेमकी काय? केदार शिंदेंनी केला मोठा खुलासा

Kedar Shinde Talk About Zapuk Zupuk Movie : केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सूरज चव्हाण पाहायला मिळणार आहे. आता केदार शिंदे यांनी चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे.
Kedar Shinde Talk About Zapuk Zupuk Movie
Kedar Shinde SAAM TV
Published On

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'झापुक झुपूक'मुळे चांगलाच चर्चेत आहे. 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk ) चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केले आहे. आता केदार शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, 'झापुक झुपूक' हा चित्रपट सूरज चव्हाणचा बायोपिक नाही आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

एका मिडिया मुलाखतीत केदार शिंदे म्हणाले, "मी 'बिग बॉस मराठी 5' म्हणालो होतो की मी सूरज चव्हाणबरोबर चित्रपट करतोय. ज्याचे नाव 'झापुक झुपूक' आहे. पण मी सूरज चव्हाणवर चित्रपट नाही करत आहे. चित्रपटाची कथा पू्र्ण वेगळी आहे. मला एका डिव्हाइसची गरज होती जे खूप भारी असेल आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. माझे अनेक अभिनेते मित्र आहेत. पण मला या चित्रपटासाठी अभिनेता नको तर पात्र हवं होते. मी नेहमीच कास्टिंगच्या बाबतीत तंतोतंत राहिलो आहे."

केदार शिंदे पुढे बिग बॉसच्या घरातील सूरजचा किस्सा सांगत म्हणाले की, "ज्या दिवशी 16 स्पर्धक बिग बॉसच्या घरात पोहचले त्या रात्री मी चॅनेल रुममध्ये बसलो होतो. तेव्हा रात्री दीड वाजता सूरज वॉशरुममध्ये शिरला. पण 7-8 मिनिटे त्याला वॉशरुमचा दरवाजा उघडेना. कारण वॉशरुमचा दरवाजा ढकल्यानंतर उजव्या बाजूने उघडतो. पण आम्ही उजवी बाजू लॉक करून डाव्याबाजूने दरवाजा उघडत होता. पण दरवाजा उघडण्याची सूरजची कसरत पाहून मला हसू आले. तेव्हा ठरवल की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य हा मुलगा माझ्या पात्रासाठी योग्य आहे. "

शेवटी केदार शिंदे म्हणाले, "चित्रपटात हमखास सूरजच्या आयुष्यातील गमती-जमती आहेत. पण हा त्याचा बायोपिक नाही. हा फक्त एक प्रेमकथा आहे. " सूरजचा 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटात इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत आणि दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Kedar Shinde Talk About Zapuk Zupuk Movie
Divyanka Tripathi : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान दिव्यांका त्रिपाठीची अचानक तब्येत बिघडली, फोटो शेअर करत म्हणाली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com