Mansi Suravase : पायऱ्यांवरून आला अन्...; छेड काढणाऱ्याला लगावली कानशि‍लात, VIDEO शेअर करत इन्फ्लुएन्सर म्हणाली...

Mansi Suravase Influencer Video : लोकप्रिय इन्फ्लुएन्सरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण तिची छेड काढताना दिसत आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.
Mansi Suravase Influencer Video
Mansi Suravase SAAM TV
Published On

आजकाल सोशल मीडियामुळे अनेक इन्फ्लुएन्सरना (social Media Influencer) ओळख मिळाली आहे. त्यांनी आपल्या कामातून खूप लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ते कायम रील, व्हिडीओ आणि फोटोमधून चाहत्यांशी कनेक्ट राहतात. सध्या असाच एका इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येएक तरुण त्या इन्फ्लुएन्सरची छेड काढताना दिसत आहे.

सोशल मीडिया मानसी सुरवसेने (Mansi Suravase) नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मानसी तिच्या इमारतीत तिच्या सोबत घडलेली घटना शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इमारतीच्या पायऱ्यांवर मानसी एक रील शूट करत होती. समोरून एक मुलगा आला. तेव्हा त्याला जाण्यासाठी वाट देत मानसी बाजूला सरकते. तेव्हा तो मुलगा जाताना मानसीच्या शरीराला स्पर्श करतो. असे घडताच मानसी त्याला अडवते आणि म्हणते की, काय प्रॉब्लेम आहे? असे बोलून तिच्या कानशिलात लगावते. मानसीचे इन्स्टाग्राम 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

मानसीने हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनमध्ये तिने पुढे घडलेला प्रसंग सांगितला आहे. तिने कॅप्शनंमध्ये लिहिलं की, "मी माझ्या बिल्डिंगमध्ये व्हिडीओ शूट करत होते. तेव्हा हा मुलगा माझ्या अंगाला स्पर्श करून तेथून पळून गेला. हे सर्व व्हिडिओत शूट होत होते. त्यामुळे जेव्हा मी हा व्हिडिओ प्रूफ म्हणून त्याच्या घरच्यांना दाखवला तेव्हा त्याच्या घरच्यांनी सांगितलं की त्याची मेंटल हेल्थ खराब आहे. पण त्याच्या डोक्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून तो बाहेर काही करणार का? "

पुढे कॅप्शनंमध्ये तिने लिहिलं की, "आपल्याकडे लोक मुलींना कपड्यांवरून जज करतात. पण मी तर आता ठीकठाक कपडे घातले होते. तरी माझ्यासोबत हे कृत्य घडले. हे योग्य आहे का? अशा समाजाचा धिक्कार आहे जे महिलांना त्यांच्या कपड्यांवरून जज करतात. मला १०००% खात्री आहे की, मी कुर्ता परिधान केला असता किंवा साडी नेसली असती तरीही त्याने हेच केले असते. "

मानसीने शेअर केलेल्या व्हिडिओवर तिल नेटकऱ्यांकडून स्क्रिप्टेड अशा कमेंट येऊ लागल्या. तेव्हा तिने त्या मुलाच्या घरी गेल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या स्टोरीला शेअर केला. त्यामध्ये तिने म्हटलं आहे की, "नेहमी स्वतःसाठी उभे राहायला शिका. आजूबाजूचे लोक तुम्हाला वाचवायला येणार नाहीत."

Mansi Suravase Influencer Video
Ground Zero vs Phule : 'ग्राउंड झिरो' की 'फुले' बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? दुसऱ्या दिवशी कलेक्शन किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com