.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ankita Walawalkar : 'बिग बॉस मराठी फेम कोकणातील लोकप्रिय युट्युबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. यासाठी तिची आणि तिचा होणार नवरा संगीत दिग्दर्शक कुणाल भगतची जोरदार तयारी सुरु आहे. बिग बॉस मराठी सिझन ५ संपल्यानंतर अंकिताने तिच्या लग्नाची घोषणा केली होती. या दोघांचे फेब्रुवारी महिन्यात लग्न होणार असल्यामुळे सध्या लागणीची लगबग सुरु आहे. पण, सध्या अंकिता एका इंन्स्टाग्राम व्हिडीओवरुन चर्चेत असून या व्हिडीओमुळे प्रचंड रागावली आहे.
अंकिता प्रभू वालावलकर सध्या आपल्या लग्नाची खरेदी करत असून तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून लग्नाच्या खरेदीबाबत अपडेट्स चाहत्यांना देत असते. अशातच किर्ती आर्ट अँड क्राफ्ट नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरून मुंडावळ्यांची एक पोस्ट शेअर करण्यात आली आणि त्यापोस्टमध्ये "कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकरच्या लग्नासाठी स्पेशल कस्टमाइझ्ड युनिक आणि नाजूक अशा मुंडावळ्या", असे कॅप्शन लिहिण्यात आला. परंतु या मुंडावळ्या अंकिताने ऑर्डर केल्या नसल्यामुळे ती भलतीच संतापली असून 'खोटं बोलून माझं नाव वापरलेलं मला आवडत नाही' असं तिने कमेंट करून निक्षून सांगितलं.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अंकिता वालावलकरला टॅगही करण्यात आले असल्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यानंतर अंकिताने केलेल्या कमेंटमुळे तिचे चाहते ही पोस्ट आणखी व्हायरल करून या पोस्ट खाली निगेटिव्ह कमेंट करत या पेजला ट्रॉल करत आहेत.
दरम्यान, बिग बॉस मराठी सीझन ५ संपल्यापासून अंकिता लगीनघाईमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर 12 ऑक्टोबरला अंकितानं आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख सर्वांना तिच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवरुन करुन दिली. येत्या फेब्रुवारीत ते दोघे लग्न करणार असल्याचं अंकितानं जाहीर केलं. अंकिताचा होणारा नवरा कुणाल भगत हा मराठी संगीत दिग्दर्शक आहे. कुणालनं अनेक मराठी चित्रपट आणि तू चाल पुढं सारख्या मालिकांसाठी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.