Shah Rukh Khan : 'म्हणून तो बादशाह आहे...' ; शाहरुख खान ठरला 3 चित्रपटातून 5000 कोटींची कमाई करणारा एकमेव सुपरस्टार

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 2024 साली एकही चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी शाहरुख खानच्या 3 चित्रपटांनी 5000 कोटींची कमाई केली आहे. शाहरुखच्या तुलनेत सलमान खान आणि आमिर खान कमाईच्या शर्यतीत खूप मागे राहिले आहेत.
Shah Rukh Khan
Shah Rukh Khan Saam Tv
Published On

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. शाहरुख हा इंडस्ट्रीत पहिल्या क्रमांकावर असलेला अभिनेता आहे. कारण अगदी स्पष्ट आहे, शाहरुख खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेता आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर 1000-1000 कोटी रुपयांचे दोन चित्रपट बॅक-टू-बॅक सिनेमा दिले आहेत. हे आकडे गाठण्यासाठी बॉलीवूडचा बादशाह शाहरुख 4 वर्षे चित्रपटापासून दूर होता. एक काळ असा होता जेव्हा 'झिरो' नंतर त्याने दीर्घ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्या कमबॅकमुळे संपूर्ण बॉक्स ऑफिस हादरले. शाहरुखच्या या कलेक्शनच्या जवळपासही सलमान खान आणि आमिर खानला जाता आले नाही.

2023 मध्ये शाहरुख खानचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले. एकापाठोपाठ एक चित्रपट पाहिल्यावर असे वाटले की किंग खान 4 वर्षे पडद्यावर नसल्याची कसर त्याने भरून काढली होती. सर्वप्रथम त्याचा ‘पठाण’ प्रदर्शित केला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख खानही माता वैष्णोदेवीच्या मंदिरात पोहोचला होता. त्यांनी तिथे त्यांच्या चित्रपटासाठी प्रार्थनाही केली आणि त्यांची इच्छाही पूर्ण झाली. 'पठाण'ने रिलीज झाल्यानंतर जगभरात 1000 कोटींचा व्यवसाय केला.

Shah Rukh Khan
Game Changer Trailer : चाहत्याच्या RIP लेटरनंतर राम चरणच्या 'गेम चेंजर'चा ट्रेलर प्रदर्शित; तीन वर्षानंतर दिसणार ॲक्शन अवतारात

शाहरुख खानच्या 3 चित्रपटांनी 5000 कोटींची कमाई केली

‘पठाण’ नंतर, शाहरुख खानने साऊथ डायरेक्टर एटलीच्या ‘जवान’ चित्रपटातून दुसऱ्यांदा थिएटरमध्ये आला. यावेळी शाहरुखच्या 'जवान' 1000 कोटींहून अधिक कमाई करत सगळ्यांना थक्क केले. पण चमत्कार तेव्हा घडला जेव्हा शाहरुख खान आणि त्याच्या दोन मुलांनी 'मुफासा द लायन किंग'मध्ये आवाज दिला. या चित्रपटाने जगभरात 3000 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि आणखी जोरदार कमाई सुरूच आहे. अशा परिस्थितीत भारतीय चित्रपटसृष्टीतील शाहरुख खान हा एकमेव अभिनेता आहे ज्याने केवळ 3 चित्रपटांमधून 5000 कोटी रुपये कमावले आहेत.

Shah Rukh Khan
Sameer Wankhede On SRK Son Aryan : 'पुन्हा संधी मिळाली तर...'; शाहरुख खानच्या लाडक्या आर्यनच्या अटकेवर समीर वानखेडेंचे मोठे वक्तव्य

सलमान खान 1000 कोटींच्या क्लबमध्ये नाही

आमिर खानने 'दंगल' या चित्रपटातून जगभरात 2000 कोटींची कमाई केली होती. मात्र, या चित्रपटानंतर त्यांचा एकही चित्रपट 1000 चा आकडा पार करू शकला नाही. सलमान खानबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे एकही 1000 कोटींचा चित्रपट नाही. मात्र, त्याच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटातून त्याला 1000 कोटींच्या क्लबमध्ये नक्कीच एंट्री मिळेल, अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत, शाहरुख खानच्या चित्रपटांचे आकडे सलमान खान आणि आमिर खानच्या पकडीपासून दूर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com