
Game Changer Trailer : ज्या क्षणाची राम चरणचे चाहते वाट पाहत होते तो क्षण आला आहे. राम चरणचा बहुप्रतिक्षित ‘गेम चेंजर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी गुरुवारी ट्रेलर रिलीज केला, ज्यामध्ये राम चरण ॲक्शन अवतारात दिसत आहे. याआधी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये राम चरणचा असाच अवतार दाखवण्यात आला होता.
एस. शंकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, दिल राजू याचे निर्माता आहेत. याआधी निर्माते हा चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये रिलीज करणार होते. मात्र, नंतर ही तारीख पुढे ढकलण्यात आली. आता ‘गेम चेंजर’ १० जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्याआधी निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना भेटीला आणला आहे.
राम चरणच्या 'गेम चेंजर'चा ट्रेलर
समोर आलेल्या या ट्रेलरमध्ये राम चरण दुहेरी भूमिकेत दिसत आहे. त्याची एक भूमिका एका नेत्याची आणि दुसरी आयएएस अधिकाऱ्याची आहे. सध्या ट्रेलर फक्त तेलुगु भाषेत रिलीज करण्यात आला आहे. हिंदी व्हर्जनचा ट्रेलर अद्याप रिलीज झालेला नाही. राम चरण जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहेत. या ट्रेलरमध्ये कियारा अडवाणी देखील दिसत आहे. मात्र, ती कोणत्या प्रकारची भूमिका साकारणार हे ट्रेलरवरून स्पष्ट झालेले नाही.
राम चरण ३ वर्षांनी हा चित्रपट घेऊन येत आहेत
राम चरण ३ वर्षांनी आपला चित्रपट घेऊन येत आहे. 2022 मध्ये रिलीज झालेला RRR हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे. त्यानंतर तो त्याच वर्षी ‘आचार्य’ नावाच्या चित्रपटात दिसला. मात्र, या चित्रपटात त्याचे वडील चिरंजीवी मुख्य भूमिकेत होते. आता तीन वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन करणारा राम चरण 'गेम चेंजर'च्या माध्यमातून लोकांवर कोणती जादू करतो हे पाहावे लागेल.
दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरची मागणी चाहते अनके दिवसांपासून करत होते यासाठी एका चाहत्याने ट्रेलर प्रदर्शित कारणही तर मी माझा जीव देईन असे RIP लेटर निर्मात्यांना देखील पाठवले होते. त्यामुळे या चित्रपटाला चाहत्यांचा भरगोस प्रतिसाद मिळणार हे नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.