Amitabh Bachchan : 'संपूर्ण देश त्यांना फक्त भारतीय...' ; अमिताभ बच्चन यांनी वाहिली देशाच्या 'महानायकांना' श्रद्धांजली, PHOTO व्हायरल

Amitabh Bachchan Post : डॉ. मनमोहन सिंग, रतन टाटा, झाकीर हुसेन आणि श्याम बेनेगल यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर सुंदर अशी पोस्ट शेअर करत आपण सगळेच भारतीय आहोत असा संदेश दिला आहे.
Amitabh Bachchan Post
Amitabh Bachchan PostGoogle
Published On

Amitabh Bachchan Post : २०२४ सालामध्ये आपण देशातील चार महानायकांना गमावले डॉ. मनमोहन सिंग, रतन टाटा, झाकीर हुसेन आणि श्याम बेनेगल. या चौघांच्या निधनानंतर एका युगाचा अंत झाला असल्याची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. या चारही महानायकांसाठी बॉलिवूडचे शहेनशान अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक मार्मिक फोटो शेअर करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

अमिताभ बच्चन यांनी केला खास फोटो पोस्ट

ही फोटो साधा पण प्रभावी आहे, एकता, आदर आणि आठवणीना उजाळा देणार असा हा ऍनिमेटेड फोटो आहे. बिग बी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर "स्वर्गातील आमचे नायक" या शीर्षकासह चारही दिग्गजांचे ऍनिमेटेड फोटो पोस्ट केले आहेत. तसेच या फोटोत, "२०२४ मध्ये एक पारसी, एक मुस्लिम, एक शीख आणि एक हिंदू यांचे निधन झाले आणि संपूर्ण देश त्यांना फक्त भारतीय म्हणून ओळखतो, असेही लिहिले आहे.

Amitabh Bachchan Post
Shah Rukh Khan : 'म्हणून तो बादशाह आहे...' ; शाहरुख खान ठरला 3 चित्रपटातून 5000 कोटींची कमाई करणारा एकमेव सुपरस्टार

हा फोटो टाकून अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन दिले, "हा फोटोच सगळं काही सांगते जातो." हे शब्द त्यांच्या संदेशाचा सारांश देतात असे दिसते - धर्म, जात किंवा पंथावर आधारित विभाजनांवर भर देणाऱ्या जगात एकतेचे आवाहन करण्याचा प्रयत्न अमिताभ बच्चन यांनी केला आहे. अमिताभ बच्चन हे त्यांच्या सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना एकता आणि बंधुतेची शिकवण कायम देत असतात.

Amitabh Bachchan Post
Game Changer Trailer : चाहत्याच्या RIP लेटरनंतर राम चरणच्या 'गेम चेंजर'चा ट्रेलर प्रदर्शित; तीन वर्षानंतर दिसणार ॲक्शन अवतारात

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी दिल्ली येथे निधन झाले. काही दिवसांपूर्वीच, २३ डिसेंबर रोजी, भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवणारे दिग्गज चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. याव्यतिरिक्त, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, भारतीय उद्योगमहर्षी रतन टाटा यांचे १० ऑक्टोबर रोजी ८६ व्या वर्षी निधन झाले. तर, जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांनी १५ डिसेंबर रोजी ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या चारही महानायकांच्या निधनामुळे कोणत्या एका समुदायाचे नाही तर देशाचे नुकसान झाले हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com