Shweta Tiwari Hospitalised: प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, डेंग्यूमुळे बिघडली प्रकृती; चाहते चिंतेत

Shweta Tiwari Hospitalised : अभिनेत्री श्वेता तिवारीला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'द ट्रेटर्स २'पूर्वी प्रकृतीची बातमी आणि एक्स पतीचे आरोप चर्चेत आले आहेत.
Shweta Tiwari Hospitalised
Shweta Tiwari HospitalisedSaam Tv
Published On

Shweta Tiwari Hospitalised: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या रुग्णालयात दाखल असून तिला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 'द ट्रेटर्स २' या बहुचर्चित रिअॅलिटी शोच्या प्रीमियरपूर्वीच श्वेताला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिचे चाहते चिंतेत आहेत. शोच्या अनेक प्रोमोमध्ये श्वेता दिसली असून तिच्या सहभागाची आधीपासूनच चर्चा होती.

श्वेता तिवारी 'द ट्रेटर्स' (The Traitors) या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार असल्यामुळे सध्या चर्चेत आहे; तिने या शोच्या अनेक प्रोमोजमध्येही सहभाग घेतला आहे. मात्र, तिला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातमीमुळे तिचे चाहते चिंतेत आहेत. तिचे चाहते ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. यापूर्वी अविका गोर आणि स्वरा भास्कर यांनाही डेंग्यूची लागण झाली होती. श्वेता तिवारीसह, मनोरंजन क्षेत्रातील आतापर्यंत एकूण तिघांना डेंग्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Shweta Tiwari Hospitalised
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं ५६व्या वर्षी निधन; दीर्घ आजाराशी झुंज अपयशी, सावत्र मुलाने लिहिली भावूक पोस्ट

'द ट्रेटर्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये श्वेता महत्त्वाची स्पर्धक म्हणून दिसणार आहे. शोच्या एका प्रोमोमध्ये स्पर्धकांमधील वाद पाहायला मिळते. या प्रोमोमध्ये श्वेता, “माझे नवरे मला फसवत असताना मी स्व:त पकडलं आहे.” असे म्हणताना दिसते. त्यावर करण तिला प्रत्युत्तर देताना दिसतो. त्यामुळे शोमध्ये सुरुवातीपासूनच आरोप-प्रत्यारोप आणि रणनीतींचा खेळ रंगणार असल्याचे दिसते.

Shweta Tiwari Hospitalised
Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

दरम्यान, श्वेताच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही जुन्या मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. तिचा एक्स पती राजा चौधरी याने श्वेतावर तिचा सह-कलाकार सेझान खानसोबत अफेअर असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर श्वेताचे इतर लोकांसोबतही संबंध असल्याचा दावा त्याने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com