Shraddha Kapoor - Eetha Video : श्रद्धा कपूरच्या 'ईथा'चा अंगावर काटा आणणारा टीझर, कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?

Eetha Movie Teaser Video : श्रद्धा कपूरच्या 'ईथा' चित्रपटाचा टीझर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरने लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारली आहे. टीझर पाहून अंगावर काटा येईल.
Eetha Movie Teaser Video
Shraddha Kapoor - Eetha Video SAAM TV
Published On
Summary

'ईथा' चित्रपटाचा टीझर व्हिडीओ व्हायरल

श्रद्धा कपूर साकारणार लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका

'ईथा' चित्रपट ऑगस्टला रिलीज होणार

रश्मिका मंदाना, शाहिद कपूर आणि कृती सेनचा 'कॉकटेल २' चित्रपट १९ जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला. मात्र 'कॉकटेल २' पाहिला गेलेले प्रेक्षक श्रद्धा कपूरचे कौतुक करताना दिसत आहे. कारण 'कॉकटेल २' या चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच श्रद्धा कपूरच्या आगामी सिनेमा 'ईथा' (Eetha) चा पहिला टीझर समोर आला. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

व्हायरल होणाऱ्या टीझर व्हिडीओमध्ये, श्रद्धा कपूर पारंपरिक साडीतील लूकमध्ये दिसत आहे. गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात असतानाचे दृश्य पाहून अंगावर काटा येतो. विठाबाईंना लावणी सुरू असताना प्रसूती कळा येतात. त्या स्टेजमागे जाऊन बाळाला जन्म देतात आणि पुन्हा स्टेजवर येऊन नृत्य सादर करताना, व्हिडीओत दिसत आहे. चित्रपटाच्या टीझरने चाहते श्रद्धा कपूरला या नव्या रंगात पाहायला उत्सुक आहेत.

'ईथा' हा चित्रपट प्रसिद्ध मराठी लावणी नर्तकी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या लोकनाट्य परंपरेतील अत्यंत प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून त्या ओळखल्या जातात. आपल्या उत्कृष्ट लावणी आणि तमाशा सादरीकरणासाठी प्रसिद्ध असलेल्या नारायणगावकर यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. पारंपरिक लोककलेतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

'ईथा' कधी रिलीज होणार?

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'ईथा' या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि मोहम्मद जीशान अय्यूब हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'ईथा' हा चित्रपट २८ ऑगस्टला रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'ईथा' चित्रपटाचे शूटिंग नाशिक, सातारा येथे झाले आहे.

विठाबाई नारायणगावकर कोण होत्या?

विठाबाई नारायणगावकर या तमाशा कलाकार होत्या. पंढरपूरमधील कलाकारांच्या कुटुंबात जन्मलेल्या विठाबाईंचे वडील आणि काका 'भाऊ-बापू मंग नारायणगावकर' नावाचा कौटुंबिक कलापथक चालवत होते. त्यांचे आजोबा, नारायण खुदे हे त्या कलापथकाचे संस्थापक होते. विठाबाई लावणी, गवळण यांसारख्या विविध प्रकारच्या गाण्यांच्या वातावरणात लहानाच्या मोठ्या झाल्या. विठाबाई नारायणगावकर या लावणी सम्राज्ञी होत्या. तमाशा आणि लावणी क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Eetha Movie Teaser Video
Bhau Kadam : लाडक्या लेकीनं वडिलांना दिलं खास सरप्राइज, पाहताच भाऊ कदम झालं भावुक| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com