Bigg Boss Marathi 6 : "तो माझा..."; बिग बॉसच्या घराबाहेर पडताच लावणी क्वीनने पलटी मारली, राधा मुंबईकरने बॉयफ्रेंडविषयी केला मोठा खुलासा

Radha Patil Mumbaikar Boyfriend : बिग बॉसच्या घरात राधा पाटीलने ती लिव्ह इन रिलेशनशिप राहत असल्याचे सांगितले. मात्र घराबाहेर पडताच तिने आपल्या नात्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे.
Radha Patil Mumbaikar Boyfriend
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

'बिग बॉस मराठी 6'मध्ये राधा पाटील सहभागी झाली होती.

गेल्या आठवड्यात राधा पाटीलची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली.

घराबाहेर पडताच राधाने आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे.

'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून राधा पाटीलची एक्झिट झाली. तिचा खेळ चाहत्यांना आवडला. घरात असताना तिने आपल्या बॉयफ्रेंडविषयी मोठा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, ती लिव्ह इन रिलेशनशिप राहत आहे. मात्र बिग बॉसच्या घराबाहेर येताच राधा पाटीलने पलटी मारली आहे. ती आपल्या रिलेशनशिपबद्दल असे काही बोली की, चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर राधा पाटीलने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. ज्यात तिला बॉयफ्रेंडबद्दल विचारण्यात आले. तेव्हा राधा म्हणाली की, "तो माझा भूतकाळ आहे... आता मी सिंगल आहे...मी आणि अनुश्री जवळपास एक तास बोलत होतो. त्यातील काहीच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. याचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ बनवले आहेत. पण मी लोकांना सांगू इच्छिते की, तो माझा भूतकाळ होता...अनुश्री तिचा भूतकाळ, एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगत होती आणि मी माझ्याबद्दल सांगितले..."

बिग बॉसच्या घरात राधा आपल्या बॉयफ्रेंडबद्दल अनुश्रीला सांगते. राधाने सांगितल्यानुसार, ती अनेक वर्ष बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. अनुश्री राधाच्या बॉयफ्रेंडला ओळखते आणि ती त्याची फॅन आहे. राधा आणि तिचा बॉयफ्रेंड 2 BHK मध्ये राहतात. त्यांचा बेडरूम वेगळा आहे आणि बाकी मुलींसाठी वेगळा रूम आहे. राधाच्या बॉयफ्रेंडला कोणतेही व्यसन नाही. त्यांच्या रिलेशनशिपला आता तीन वर्ष झाली आहेत. तो तिच्या विरुद्ध कोणी काही बोल तर अजिबात ऐकून घेत नाही. तो कायम राधाच्या हाताने जेवतो. त्यामुळे तिला बिग बॉसच्या घरात त्याची आठवण येत आहे आणि त्याची काळजी वाटत आहे. राधा म्हणते, "तो अगदी देसी बॉय आहे..."

राधा पुढे म्हणते, "मला शोमध्ये खूप लोक बोलतात, जर येथे तो असता तर कधीच त्यांना मारून निघून गेला असता. आम्ही जेव्हा बाहेर जातो. तेव्हा त्याच्यासोबत फोटो काढायला चाहत्यांची गर्दी होते. लोक त्याच्यासाठी वेडे आहेत. पण त्याने माझा हात कधीच सोडला नाही. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. मी त्याच्यावर चिडचिड, ओरडते पण तो सगळे सहन करतो..." राधा अनुश्रीला बॉयफ्रेंडचे नाव सांगते. मात्र शोमध्ये त्याचा खुलासा होत नाही.

Radha Patil Mumbaikar Boyfriend
Rubina Dilaik : जुळ्या मुलींच्या जन्मानंतर आता दुसऱ्यांदा आई होणार टिव्हीची 'छोटी बहू'? गुडन्यूज देत VIDEO केला शेअर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com