Rubina Dilaik : जुळ्या मुलींच्या जन्मानंतर आता दुसऱ्यांदा आई होणार टिव्हीची 'छोटी बहू'? गुडन्यूज देत VIDEO केला शेअर

Rubina Dilaik Second Pregnancy Announcement : टिव्हीची 'छोटी बहू' दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अभिनेत्रीने स्वतः व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Rubina Dilaik Second Pregnancy Announcement
Rubina Dilaiksaam tv
Published On
Summary

रुबीना दिलैक टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

रुबीना दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

रुबीनाने प्रेग्नेंसी संबंधित माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

टिव्हीची 'छोटी बहू' रुबीना दिलैक आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ती टिव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा आहे. तिने आजवर अनेक मालिका, टिव्ही शो, रिअ‍ॅलिटी शो यांमध्ये सहभाग घेतला आहे. रुबीना दिलैकने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. रुबीना आता दुसऱ्यांना आई होणार आहे. अभिनेत्रीने प्रेग्नेंसी संबंधित एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

रुबीना दिलैकने इन्स्टाग्राम एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात ती सुंदर साडीत दिसत आहे. ती व्हिडीओत म्हणते की, "I Am Pregnant" (मी प्रेग्नेंट आहे) तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र तिच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. ही गुडन्यूज आहे की तिच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

रुबीना दिलैकने 2018 ला अभिनेता अभिनव शुक्लाशी लग्नगाठ बांधली. 2023 मध्ये रुबीनाने आपल्या दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. जीवा आणि एधा (Jeeva and Edhaa) अशी त्यांची नावे आहेत. रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे टिव्ही विश्वातील पावर कपल आहे. यांचा मोठा चाहता वर्ग आहे. हे जोडपे कायम एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात.

rubina Dilaik
rubina Dilaiksaam tv

वर्कफ्रंट

रुबीना दिलैक ही 'बिग बॉस 14' ची विजेता आहे. 'पति पत्नी और पंगा - जोडी का रिॲलिटी चेक' या रिॲलिटी शोचे विजेते देखील रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला झाले. त्याच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. 'लाफ्टर शेफ सीझन 2' मध्ये देखील दोघांनी सहभाग घेतला होता. तसेच रुबीना दिलैक 'खतरों के खिलाडी'मध्ये देखील आली होती.

Rubina Dilaik Second Pregnancy Announcement
Gaurav Khanna : "दिल हमेशा कुर्बान होता है..."; बिग बॉस विजेता गौरव खन्ना अन् आकांक्षा चमोला यांचा 9 वर्षांचा संसार मोडला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com