Avika Gor : 'बालिका वधू' फेम अविका गौर प्रेग्नेंट? 'त्या' वक्तव्याने चर्चेला उधाण, पाहा VIDEO

Avika Gor Pregnancy Rumours : 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अलिकडेच लग्न बंधनात अडकली आहे. सध्या सोशल मीडियावर अविका गौरच्या प्रेगनेंसी चर्चा पाहायला मिळत आहे.
Avika Gor Pregnancy Rumours
Avika Gor saam tv
Published On
Summary

अविका गौरला 'बालिका वधू' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली.

अविका गौरने बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत लग्नगाठ बांधली.

अविका प्रेग्नेंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

'बालिका वधू' या शो मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) अलिकडेच लग्नबंधनात अडकली. अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न केले आहे. अविकाने तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अविका गौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे युट्यूब चॅनेल देखील आहे. त्याने एक व्लॉग टाकला आहे. ज्यात त्यांनी गुडन्यूज विषयी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, 2026 मध्ये आमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अविका गौर प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप अविकाने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

व्हिडीओमध्ये मिलिंद म्हणतो की, "हा असा बदल आहे ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. काही प्लान केला नव्हता. आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण हा बदल खूप मोठा आणि खूप सुंदर आहे." जेव्हा अविकाने त्याला विचारले की, "तू घाबरला आहेस का?" तेव्हा मिलिंद म्हणाला की, "तो आनंदी आणि उत्साहित आहे, पण थोडा घाबरला आहे..." तो म्हणाला, "आयुष्यात थोडे घाबरणे महत्त्वाचे आहे." अविकाने लवकरच तिच्या युट्यूब कुटुंबासोबत ही आनंदाची बातमी शेअर करणार असल्याचे सांगितले आहे.

मिलिंद चंदवानी कोण?

अविका गौर आणि मिलिंद चंदवानी हे 'पती पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. या शोच्या सेटवर काल (30 सप्टेंबर) ला विवाहबंधनात अडकले. अविका गौरचा होणारा नवरा मिलिंद चंदवानी 'कॅम्प डायरीज' या एनजीओचा बेंगळुरू येथील संस्थापक आहे. त्याने 'एमटीव्ही रोडीज रिअल हिरोज'मध्येही सहभाग घेतला होता. मीडिया रिपोर्टनुसार, अविका गौर आणि मिलिंद चंदवानी गेल्या 5 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत.

Avika Gor Pregnancy Rumours
Marathi Serial : 'बिग बॉस' विजेत्याची मालिका अवघ्या २ महिन्यांत बंद होणार; शेवटच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com