स्टार प्रवाह वाहिनीवर 'तुझ्या सोबतीने' मालिका सुरू होत आहे.
'बिग बॉस' विजेत्याची मराठी मालिका अवघ्या २ महिन्यांत बंद होणार आहे.
मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे.
नवीन वर्षात स्टार प्रवाहवर नवीन मालिका सुरू होत आहेत. तसेच काही जुन्या मालिका संपतही आहेत. येथे टीआरपीसाठीची चढाओढ पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'काजळमाया' प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेत 'बिग बॉस मराठी 4' चा विजेता अक्षय केळकर मुख्य भूमिकेत होता. अवघ्या 2 महिन्यात मालिकेने गाशा गुंडाळला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'काजळमाया' ही मराठी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या २ महिन्यात मालिका संपणार आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत चेटकीण वंशामधील 'पर्णिका' नावाच्या चेटकीणीची गोष्ट पाहायला मिळाली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पर्णिका आणि कनकदत्ताचा कायमचा अंत होताना दिसत आहे. या प्रोमोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे.
प्रोमोच्या व्हिडीओला लिहिलं की, "पर्णिका आणि कनकदत्ताचा होणार कायमचा अंत...अंतिम भाग..." 'काजळमाया' मालिकेचा अंतिम भाग रविवार 11 जानेवारी रात्री 11:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर रिलीज होणार आहे. 'काजळमाया' मालिका 27 ऑक्टोबर 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि आता 11 जानेवारी 2026 मध्ये मालिका संपणार आहे. या मालिकेत अक्षय केळकरसोबत प्रिया बेर्डे, रुची जाईल, वैष्णवी कल्याणकर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले.
19 जानेवारीपासून स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री 9 वाजता 'तुझ्या सोबतीने' ही नवीन मालिका सुरू होत आहे. यामध्ये अजिंक्य ननावरे, माधवी निमकर आणि एतशा संझगिरी हे कलाकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रेक्षक मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.