Shreya Maskar
'बिग बॉस मराठी 4' चा विजेता अक्षय केळकर अखेर लग्नबंधनात अडकला आहे.
अक्षय केळकरने 9 मे रोजी आपल्या गर्लफ्रेंडसोबत (साधना काकतकर) लग्नगाठ बांधली आहे.
अक्षय केळकर आणि साधना काकतकर 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
लग्नासाठी 'रमाक्षय' यांनी पारंपरिक लूक केला होता.
अक्षय केळकर साधनाला प्रेमाने 'रमा' अशी हाक मारतो.
लग्न विधींसाठी साधनाने गोल्डन रंगाची साडी नेसली होती.
हातात हिरवा चुडा, केसात गजरा आणि नाकात नथ यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती.
अक्षयने पांढऱ्या, गोल्डन रंगाचे धोतर, लाल शेला आणि पेशवाई पगडी परिधान केली आहे.
अक्षय केळकरची बायको साधना काकतकर ही गायिका आहे.