Shreya Maskar
आज (10) मे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परबचा वाढदिवस आहे.
शिवाली परबला 'कल्याणची चुलबुली' या नावाने ओळखले जाते.
शिवालीने एका मिडिया मुलाखतीत सांगितले की, तिला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये नम्रता संभेराव हिच्या मदतीमुळे एन्ट्री मिळाली.
शिवाली पूर्वी एकांकिका आणि नाटकांमध्ये काम करायची.
बदलापूरमधील आग्री महोत्सवाच्या कार्यक्रमात तिची नम्रता संभेराव हिच्यासोबत भेट झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता संभेराव आणि अरुण कदम करत होते.
तेव्हा आग्री भाषा येणारी मुलं कार्यक्रमात हवी होती आणि शिवालीला आग्री भाषा येत असल्यामुळे नम्रताने तिला शोचा भाग करून घेतले.
शिवालीचा परफॉर्मन्स नम्रता संभेराव खूप आवडला.
थोड्या दिवसाने शिवाली परबला हास्यजत्रेच्या ऑडिशनसाठी एक फोन आला.