Bhau Kadam : लाडक्या लेकीनं वडिलांना दिलं खास सरप्राइज, पाहताच भाऊ कदम झालं भावुक| VIDEO

Bhau Kadam Daughter Video : प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि कॉमेडीयन भाऊ कदमांच्या लेकीने त्यांना खास सरप्राइज दिले. जे पाहून भाऊ कदम खूप भावुक झाले.
Bhau Kadam Daughter Video
Bhau Kadam saam tv
Published On
Summary

भाऊ कदम यांना 'चला हवा येऊ द्या' मुळे खूप लोकप्रियता मिळाली.

नुकतेच त्यांचे गौतमी पाटीलसोबत गाणे आले.

लाडक्या लेकीने भाऊ कदम यांना खास सरप्राइज दिले.

'चला हवा येऊ द्या' फेम मराठी अभिनेते भाऊ कदम सध्या आपल्या नवीन गाण्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. अलिकडेच भाऊ कदम यांचे लावणी क्वीन गौतमी पाटीलसोबत 'हिल हिल पोरी हिला' हे गाणे रिलीज झाले. या गाण्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. भाऊ कदमांच्या लेकीने म्हणजे मृण्मयी कदमने देखील वडीलांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचे कौतुक केले. अशात आता मृण्मयीने आपल्या लाडक्या वडिलांना एक खास सरप्राइज दिले आहे.

भाऊ कदम यांची लेक गेले काही वर्ष शिक्षण आणि कामानिमित्त परदेशात राहते. मृण्मयीने परदेशात शिक्षण घेत घेत कामही केले. मृण्मयी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठी गेली होती. तेव्हा तिने शिक्षणासोबत कॅफेमध्ये नोकरीही केली. आता शिक्षण पूर्ण करून मृण्मयी भारतात परतली. तिने अचानक येऊन वडिलांना खास सरप्राइज दिले. मृण्मयी तिच्या बाबांना सरप्राइज देण्यासाठी एअरपोर्टला पोहचली. तिने याचा एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

भाऊ कदम एअरपोर्टवर लेकीला पाहताच खूप भावुक झाले. त्यांना आनंदाचा धक्का बसला. बाप-लेकी दोघेही रडताना दिसले. मृण्मयीने वडिलांना घट्ट मिठी मारली. दोघांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि समाधान दिसत होते. मृण्मयीने कॅप्शमध्ये लिहिलं की, "अमेरिकेतून भारतात सरप्राइज भेट...मला पाहताच वडिलांची प्रतिक्रिया अनमोल होती..." मृण्मयीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. बाप-लेकीच्या जोडीचे कौतुक करत आहेत.

'हिल हिल पोरी हिला' गाण्यावर डान्स

मृण्मयीने भारतात आल्यावर आपल्या वडिलांसोबत 'हिल पोरी हिला' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. जो खूप व्हायरल झाला. या डान्स व्हिडीओत भाऊ कदम आपल्या तिन्ही मुलींसोबत थिरकताना दिसले. मृण्मयीही भाऊ कदम यांची मोठी लेक आहे.

Bhau Kadam Daughter Video
"दया, दरवाजा तोड दो..."; CID ची टीम परत येतेय, नवीन शो ची घोषणा | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com