Shreya Maskar
पहिल्यांदाच भाऊ कदम आणि गौतमी पाटील ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या जोडीवर महाराष्ट्रातून प्रेमाचा वर्षाव होत आहे.
५ जून २०२६ ला गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांचे 'हिल हिल पोरी हिला…' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. दोघेही एक वेगळ्या अंदाजात गाण्यात पाहायला मिळत आहेत.
'हिल हिल पोरी हिला…' हे गाणे दादा कोंडके यांचे आहे. हे सुंदर रिमेक व्हर्जन सुपरहिट ठरले आहे. हे गाणे दादा कोंडके यांच्या 'आंधळा मारतो डोळा' या चित्रपटातील आहे.
'हिल हिल पोरी हिला...' हे गाणे गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे.
गाण्यात भाऊ कदम आणि गौतमी पाटील वेगवेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. पण चाहत्यांना गौतमीचा लाल साडीतला लूक खूप आवडला. गौतमीने सुंदर नऊवारी साडी नेसली आहे आणि भाऊ कदमने दादा कोंडके स्टाइल लूक केला आहे.
भाऊ कदम यांच्या लेकीने कमेंट करत वडीलांचे कौतुक केले आहे. तिने लिहिलं की, "गाणं खूप आवडलं...एकदम मस्त! या गाण्यावर कधी डान्स करतेय असं झालंय..."
"दोघेही खूप सुंदर दिसतेय...", "खतरनाक गाणं", "सुपरहिट गाणं", "महाराष्ट्राची १ नंबर ची जोडी...", "दोघांची केमिस्ट्री कमालच", "गौतमी ताई-लाल परी..." अशा कमेंट्स गाण्यावर येत आहेत.
चाहते आणि कलाकार मंडळी गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांच्या गाण्यातील केमिस्ट्रीचे कौतुक करताना दिसत आहे. भाऊ कदम कॉमेडीचे किंग आणि गौतमी पाटील लावणीची क्वीन आहे.