Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नेहमीच पारंपारिक लूकमध्ये दिसते. तिचा हा मराठमोळा लूक मंगळसूत्रामुळे अजूनच सुंदर दिसतो.
सध्या बाजारात वेगवेगळ्या डिझाइनचे मंगळसूत्र आहेत. यात काही मॉर्डर्न, ऑक्साइडचे, डायमंडचे मंगळसूत्र आहेत.
मृण्मयीने मात्र या सगळ्यापासून हटके आणि पारंपारिक मंगळसूत्राची डिझाइन निवडली आहे. तिचे सोन्याचे मंगळसूत्र फारच सुंदर आहे.
मृण्मयीच्या मंगळसूत्राची खासियत म्हणजे यामध्ये कोणतंही पेडंट नाही आहे.
या मंगळसूत्रात फक्त काळे मणी सोन्याच्या चैनीत गुंफलेले आहेत. मंगळसूत्र मोठं आहे.
हे मंगळसूत्र तीन ते चार पदरात गुंफलेलं दिसत आहे. त्यामुळे मंगळसूत्र मोठं आणि जाड दिसत आहे.
मृण्मयीकडे साध्या साडीवर वेअर करण्यासाठीदेखील सिंपल मंगळसूत्र आहे. हे मंगळसूत्र लहान आहे. त्यात दोन वाट्या आहेत.
अजून एक पारंपारिक मंगळसूत्राची डिझाइन अभिनेत्रीकडे आहेत.ज्या फक्त काळे मणी आहेत त्यात गोल्डन पेडंट आहे.